भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष बदलणार
शिवराज सिंह चौहान यांचे नाव आघाडीवर
नवी दिल्ली :
लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपला नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहेत. सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ ६ जून रोजी संपणार आहे.
याआधी त्यांना जून २०२४ पर्यंत मुदवाढ दिली होती. जेपी नड्डा यांच्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जेपी नड्डा यांच्याआधी अमित शहा, नितीन गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. नड्डा यांच्यानंतर पाच जणांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. यात शिवराज सिंह चौहान, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, ओम माथूर आणि वसुंधरा राजे यांच्या नावांची चर्चा आहे. यात शिवराज सिंह चौहान यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.
भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला गेला होता. जेपी नड्डा हे २०१९ मध्ये भाजपचे कार्यकारी अध्यक्ष बनले होते. त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे २०२० मध्ये हातात घेतली. तेव्हापासून जेपी नड्डा हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.जेपी नड्डा यांच्यानंतर भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण ? याची चर्चा आता होत आहे. जेपी नड्डा यांच्याआधी अमित शहा आणि नितीन गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपला नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळाल्यास महाराष्ट्र संघटनेतही बदल होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात होणारे बदलही महत्त्वाचे ठरणार आहेत.
शिवराज चौहान यांच नाव आघाडीवर आहे. शिवराजसिंह चौहान हे २००५ पासून मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री व लोकसभा सदस्य आहेत. ते सर्वप्रथम इ.स. १९९१ मध्ये मध्य प्रदेश राज्यातील विदिशा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्येही ते त्याच मतदारसंघातून विजयी झाले.२००५ साली भाजपने त्यांची मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदावर नेमणूक केली. त्यानंतर २००८ व २०१३ सालच्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने यशस्वीपणे बहुमत जिंकले व चौहान मुख्यमंत्रीपदावर कायम राहिले.
शिवराज सिंह चौहान यांच्यशिवाय भूपेंद्र यादव यांच्या नावाचीही चर्चा आहे. ते पक्षाच्या विविध पदांवर आहेतच. याशिवाय 2017 आणि 2020मध्ये बिहार आणि गुजरातमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाचे प्रभावी, यशस्वी नेतृत्व करणारा एक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. यादव हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे विश्वासू सहकारी आहेत.
