मालदीवने गुडघे टेकले


भारतीय पर्यटकांना त्यांच्या देशात येण्याचे आवाहन

माले
भारताशी पंगा घेणे महागात पडलंय हे कळून चुकल्याने मालदीव सरकारने भारतीय पर्यटकांना त्यांच्या देशात येण्याचे आवाहन केले आहे. मालदीवच्या मंत्र्याने म्हटले की, भारताने आपली नाराजी संपवली नाही तर आम्ही उद्ध्वस्त होऊ. मालदीवने भारतापुढे गुडघे टेकले आहेत आणि आता भारतीयांना आकर्षित करण्यासाठी एक विशेष सुविधा सुरू केली आहे. भारतीय पर्यटकांसाठी लवकरच विशेष सेवा सुरू करणार असल्याचे मालदीवच्या मंत्र्यांनी सांगितले आहे.

Advertisement

मालदीवचे आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री मोहम्मद सईद म्हणाले की, आम्ही आमच्या देशात भारताची रूपे सेवा सुरू करण्याची तयारी करत आहोत. याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर मालदीवमध्ये येणाऱ्या भारतीय पर्यटकांना रुपयात पैसे खर्च करता येणार आहे. मात्र, त्याची तारीख अद्याप ठरलेली नसून, त्यावर लवकरच अंतिम निर्णय होऊ शकतो.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने रूपे सेवा सुरू केली आहे. हे पहिले भारतीय उत्पादन आहे, जे जागतिक कार्ड पेमेंट नेटवर्कशी जोडलेले आहे. आतापर्यंत अनेक देशांनी हे स्वीकारले आहे. एटीएम व्यतिरिक्त, रुपे कार्ड पीओएस मशीन आणि ई-कॉमर्स वेबसाइटवर देखील वापरले जाऊ शकतात.
रुपेमुळे आमचे चलनही मजबूत होईल, असे मालदीवचे मंत्री म्हणाले आहेत. जगभरात डॉलरवरुन अनेक चढउतार पाहायला मिळतात. यामुळे इतर देशाच्या चलनाला मोठा फटका बसतो. भारतासारख्या देशासोबत स्थानिक चलनात व्यापार केल्यास मालदीवला देखील आर्थिक बळ मिळेल. ऑगस्ट 2022 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलेह यांनी मालदीवमध्ये रुपे कार्ड सुरू करण्यासाठी भारतासोबत चर्चा सुरु केली होती. यामुशे द्विपक्षीय पर्यटन आणि व्यापार वाढण्यास देखील मदत होईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!