फिर एक बार मोदी सरकार


विविध एक्झिट पोलचा अंदाज
नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर विविध एक्झिट पोलमधून देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार येणार असल्याचे अनेक एक्झिट पोलमधून अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याच बरोबर इंडिया आघाडीचे सर्व दावे एक्झिट पोलनी फोल ठरवले आहेत. बहुतेक राज्यांत भाजपची कामगिरी दमदार झाल्याचे म्हटले आहे. काही एक्झिट पोलनी भाजपला ३५० हून अधिक जागा मिळणार असल्याचे म्हटले आहे. भाजपला सर्वाधिक फायदा दक्षिण भारतात झाल्याचे दिसत आहे. केरळपासून तेलंगणापर्यंत भाजपच्या जागा वाढल्याचे एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला तृणमूल काँग्रेस पेक्षा अधिक जागा मिळत असल्याचा अंदाज आहे. राजधानी नवी दिल्लीत भाजपने क्लीन स्विप केल्याचा अंदाज आहे.
विविध वाहिन्या किंवा संस्था यांनी केलेल्या एक्झिट पोलचे निकाल पुढीलप्रमाणे आहेत
टाइम्स नाऊ नवभारत ईटीजी
या एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार एनडीएला ३५८ जागा, इंडिया आघाडीला १३२ जागा तर अन्य पक्षांना ५३ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

एबीपी- सी व्होटर
या एक्झिट पोलनुसार भाजप तिसऱ्यांदा देशात सत्ता स्थापन करेल. एनडीएला ३५३ ते ३८३ जागा, इंडिया आघाडीला १५२-१८२ जागा तर अन्यला ४ ते १२ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

एक्सिस माय इंडिया
आजतक-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजप आघाडीला ४०० पेक्षा अधिक जागा मिळू शकतील. या सर्व्हेनुसार भाजप ३६१ ते ४०१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. इंडिया आघाडीला १३१ ते १६६ जागा मिळतील असे म्हटले आहे.

मॅट्रीज
मॅट्रीजनुसार देशात एनडीएला ३५३ ते ३६८ जागा मिळतील. तर इंडिया आघाडीला ११८ ते १३३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अन्य पक्षांना ४३ ते ४८ जागा मिळतील असा अंदाज मॅट्रीजने वर्तवला आहे.

पीएमएआरक्यू
पीएमएआरक्यू च्या एक्झिट पोलनुसार देशात एनडीएला ३५९ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला १५४ जागा मिळतील. अन्यला ३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जन की बात
जन की बातच्या एक्झिट पोलनुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला ३७७, इंडिया आघाडीला १५१ तर अन्यला १५ जागा मिळण्याची शक्यता आहे.

डी डायनॅमिक्स
डी डायनॅमिक्सच्या एक्झिट पोलनुसार एनडीएलाआघाडीला देशात ३७१ तर इंडिया आघाडीला १२५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अन्य पक्षांना ४७ जागा मिळतील असे म्हटले आहे.
नॅशनल न्यूज
नॅशनल न्यूजच्या एक्झिट पोलनुसार भाजप आणि मित्र पक्षांना ३४२ ते ३७८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. इंडिया आघाडीला १५३ ते १६९ जागा मिळतील तर अन्यला २१ ते २३ जागा मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!