जुळ्या बहिणीना समान गुण
सवयी सारख्या,स्वभावही सारखे ,गुणही सारखेच
पंढरपूर
पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील याच जुळ्या बहीणीनी दहावीच्या परीक्षेत एक सारखे यश मिळवत साऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत. या दोन्ही मुलींचे स्वभाव, सवयी सगळे सारखे आहे. शिवाय दहावीचा अभ्यास देखील या दोघींनी मिळून केला आणि काल लागलेल्या निकाल पाहताना त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. तो म्हणजे या दोघी जुळ्या बहीणीने परीक्षेत मिळवलेले गुण देखील सारखेच आहेत.
पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील आदर्श प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील तेजश्री आणि तृप्ती सुरेश नागणे या जुळ्या बहिणी दहावीचे शिक्षण घेत होत्या. त्यासाठी त्यांनी सोबतच अभ्यास केला आणि परीक्षाही दिली. तर या परीक्षेचा निकाल सोमवारी लागला. यात तेजश्री आणि तृप्तीने समान 93 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.परीक्षा म्हटली की दोघांमध्ये काही अंशी स्पर्धा असल्याचे देखील चित्र होतं. त्यामुळे सर्वार्थानं एकसारख्या असणाऱ्या या दोन जुळ्या बहिणी परीक्षेत नेमकं काय करतात याकडे सऱ्यांचे लक्ष होत. मात्र निकाल हाती येताच त्यांनी आपल्या नित्यक्रम परीक्षेतही कायम ठेवला आहे. त्यांचा हा निकाल पाहताना नागणे कुटुंबियासह सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
