एसआयटी अध्यक्षच वादग्रस्त
पुणे अपघात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती
पुणे :
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवत दोन जणांना चिरडलं.अल्पवयीन आरोपीच्या वडीलांनी पुरावे नष्ट करण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना पैसे पुरवले. या प्रकरणात ससून हॉस्पिटलमधील वैद्यकीय तपासणी आणि उपचारासंदर्भात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी समिती गठीत करण्यात आली आहे. या एसआयटी समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे आहेत.
दरम्यान, या समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर आधीच भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यामुळे एसआयटी समितीच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. नियुक्तीनंतर प्रथमच पल्लवी सापळेंसह समितीचे सदस्य ससून रुग्णालयात दाखल झाले. या वेळी त्यांना विरोधकांच्या आरोपांविषयी विचारले असता त्या किंचित हसल्या आणि म्हणाल्या, माझी नियुक्ती शासनाकडूनच, त्यांनाच विचारा
पल्लवी सापळ्या म्हणाल्या, पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी मी आहे. कल्याणी नगरमधील अपघाताचा घटनाक्रम आम्ही घेऊन त्याबद्दलचा अहवाल शासनाला कळवू. शासनाच्या चौकशीचे निकष ठरलेत त्याप्रमाणे चौकशी करणार आहे. त्या दिवशी घडलेल्या घटनेची चौकशी होणार आहे. त्याच्या संबंधी असणाऱ्या सर्वांची चौकशी होईल.
पल्लवी सापळे यांची नियुक्ती सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. या संदर्भात विरोधकांकडून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहे. याविषयी बोलताना पल्लवी सापळे म्हणाल्या, माझे नियुक्ती शासनाने केली आहे. याचे उत्तर देण्याचे सक्षम अधिकारी शासन आहेत.मी नाही
