आगीत 6 नवजात बालकांचा मृत्यू,
दिल्लीत हॉस्पिटलमध्ये दुर्घटना ,6 बालके व्हेंटिलेटरवर
नवी दिल्ली
दिल्लीच्या विवेक विहारमध्ये असलेल्या नवजात बालकांच्या हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीत 6 बालकांचा मृत्यू झाला आहे.दिल्ली अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार रात्री 11 वाजून 32 मिनिटांनी रुग्णालयात आग लागल्याची माहिती मिळाली होती.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयातून 12 बालकांना बाहेर कढण्यात आलं होतं. पण त्यापैकी 6 बालकांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.इतर सहा बालकांना रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.अग्निशमन अधिकारी राजेश अटवाल यांनी आगीचं कारण अद्याप समजू शकलं नसल्याचं सांगितलं आहे.रुग्णालयाच्या आजुबाजुला असलेल्या इमारतींचंही आगीमुळं नुकसान झालं आहे.
