मोफत अभिनय कार्यशाळा


बालरंगभूमी परिषदेच्या सातारा शाखेतर्फे आयोजन
सातारा
अखिल भारतीय मराठी नाट्य परीषदेच्या बालरंगभूमी परिषदेच्या सातारा शाखे तर्फे ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी ३१ मे ते २ जून रोजी मोफत अभिनय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. मर्यादित प्रवेश असल्याने आग्रक्रमाने नाव नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. या शिबिरात डॉ. निलेश माने, रसिका केसकर, चैतन्य पाटेकर, स्नेहा धडवई, प्रवीण यादव, भक्ती झणझणे, नील केळकर आदी मान्यवर या कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहे. तरी सर्वांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्ष डॉ. निलेश माने यांनी केले आहे. सातारा येथील बालक आणि पालकांना रंगभूमी विषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. आजचे बालरंगकर्मी हे उद्याचे रंगकर्मी किंवा निदान उत्तम प्रेक्षक नक्की असतील. आणि नाट्यकला व आनुषंगिक कला जिवंत ठेवण्यासाठी बालरंगभूमी अधिक सुदृढ झाली पाहिजे. अधिक माहिती साठी संपर्क : रसिका केसकर 94206 30374, चैतन्य पाटेकर 93733 80236


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!