डोंबिवली स्फोटाने हादरली


एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट
मुंबई
डोंबिवलीतल्या एमआयडीसी भागात असलेल्या सोनारपाडा या ठिकाणी एका केमिकल कंपनीत मोठ्ठा स्फोट झाला आहे. त्यानंतर छोट्या स्फोटांचे काही आवाजही ऐकू आले आहेत. या स्फोटांमुळे साधारण तीन ते चार किमीचा परिसर हादरला आहे.आगीचे लोळ आणि धुराचे लोट हवेत दिसून येत आहेत. या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त होते आहे.पाच ते सहा कामगार जखमी झाल्याची भीती व्यक्त होते आहे. डोंबिवली अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
स्फोट एवढा मोठा होता की आजूबाजूच्या इमारतींच्या व रस्त्यावर लावलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. एमआयडीसी सागाव साईबाबा मंदिर मागे कंपनीत बॉयलरच स्फोट झाला असून आजूबाजूच्या परिसरामध्ये हवेतून राख पडत आहे.स्फोट झाल्यानंतर रस्त्यावरर मोठ्या प्रमाणावर राख उडाली आहे. तसंच मोठे लोखंडी कणही उडाले आहेत. राख वाहनांवर पडते आहे, तसंच स्फोटांचे आवाज येत आहेत त्यामुळे एमआयडीसी निवासी विभागांतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.अनेक इमारतींच्या घराच्या काचा तावदाने फुटली आहेत.: काही पादचारी राखेने माखले आहेत. काही कुटुंब आपल्याला लहान मुलांसह रस्त्याने चालत होती. यावेळी स्फोट झाल्याने ‘मुले घाबरून मोठ्याने रडू लागली. चालत असताना वरून राखेचा वर्षाव होऊ लागल्याने पादचारी वाहन चालक घाबरले आहेत.
भीषण स्फोटानंतर एमआयडीसीतून बाहेर पडलेल्या एका कामगाराने सांगितलं की, स्फोट झाला ती आमच्या बाजूची कंपनी होती. इतका मोठा स्फोट होता की, आम्ही सगळे बाहेर पडलो. सगळे आगीचे लोळ येत होते. आमच्या हाताला भाजले आहे,
काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मोठे स्फोट झाले, दोन ते तीन किलोमीटरपर्यंत हादरे जाणवले. अनेकांच्या घरांच्या काचेच्या खिडक्या फुटल्या आहेत. अग्निशमन दलाकडून अतिरिक्त कुमक मागवून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग भीषण असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आतमध्ये जाणे अद्याप शक्य झालेले नाही. अजूनही याठिकाणी स्फोट सुरु आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!