चांगला श्रोताच चांगला वक्ता होऊ शकतो


वसंत व्याख्यानमालेमध्ये प्रा.सचिन देवरे यांचे प्रतिपादन
सातारा
हजारो लोकांसमोर अस्खलितपणे भाषण करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते पण अशा प्रकारे वक्ता म्हणून विकसित होण्यासाठी आधी श्रोता म्हणून विकसित होणे गरजेचे आहे एक चांगला श्रोताच भविष्यात चांगला वक्ता होऊ शकतो असे प्रतिपादन प्रख्यात व्याख्याते प्राध्यापक सचिन देवरे यांनी केले
येथील ज्ञानविकास मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये लाखो लोकांसमोर मी बोलणारच या विषयावर बोलत असताना सचिन देवरे यांनी वक्तृत्व शैलीतील अनेक पैलू उलगडले
प्राध्यापक सचिन देवरे म्हणाले, इतरांचे म्हणणे किंवा इतरांची भाषणे जो व्यवस्थितपणे ऐकू शकतो तोच भविष्यामध्ये चांगला श्रोता होऊ शकतो म्हणूनच ज्याला स्वतःला वक्ता म्हणून विकसित करायचे आहे त्यांनी प्रथम ऐकण्याचे काम करायला हवे आणि ज्या ठिकाणी संधी उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन इतरांचे भाषण किंवा इतरांचे म्हणणे ऐकायला हवे

Advertisement


हजारो लोकांसमोर वक्तृत्व प्रदर्शित करण्यासाठी विश्वास आणि आत्मविश्वास या दोन्हीही गोष्टी गरजेच्या असल्याचे सांगून सचिन देवरे म्हणाले आपले भाषण लोकांना कंटाळवाणे होणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागते त्यासाठी उत्कृष्ट वक्त्याने नेहमीच घड्याळाकडे पाहायला हवे आपल्याला भाषणासाठी किती वेळ दिला आहे यावर नजर ठेवूनच आपल्या विषयाची मांडणी करणे गरजेचे असते
भाषणासाठी दिलेला विषय समोरच्या श्रोत्यांची वैशिष्ट्ये आणि विद्यमान सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला आपल्या भाषणाची तयारी करावी लागते समयसूचकता हे उत्कृष्ट वक्त्याचे वैशिष्ट्य आहे ऐनवेळी व्यासपीठावर काहीही गडबड झाली तरी त्यातून निभावून नेण्याचे काम ही समय सूचकता करते असेही सचिन देवरे यांनी सांगितले
चांगला वक्ता होण्यासाठी प्रत्येकाने चांगले वाचनही करण्याची गरज आहे आणि या वाचनाच्या माध्यमातून मिळालेल्या अनेक गोष्टी आपल्या भाषणामध्ये प्रसंगानुरूप पेरण्याची हातोटी विकसित करायला हवी असेही सचिन देवरे यांनी सांगितले भाषण नीरस होऊ नये म्हणून आपल्या भाषणामध्ये योग्य प्रकारे विनोदाची पेरणी करणे ही गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र शिवदे होते
प्रसाद चाफेकर यांनी व्यासपीठावरील सर्वांचा सत्कार केला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!