केजरीवाल यांचा पीए गायब


स्वाती मालीवाल हल्ला प्रकरणी पोलीस घेतायत शोध

Advertisement

नवी दिल्ली
आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या कथित हल्ल्याचा दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.स्वाती मालिवाल यांनी अखेर दिल्ली पोलिसांसमोर आपले जबाब नोंदवले असून अनेक भीतीदायक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. आता पोलीस या हल्ल्यातील मुख्य आरोपी विभव कुमारचा शोध घेत आहेत. विभव कुमार हे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचे पीए आहेत.
स्वाती यांच्यावर हल्ला झाला तेव्हा अरविंद केजरीवालही घरात उपस्थित होते. त्यामुळे दिल्ली पोलीस त्याचीही चौकशी करू शकतात. दिल्ली पोलीस घटनेच्या वेळी उपस्थित पोलीस कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवणार आहेत. दिल्ली पोलिस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात लावलेले सीसीटीव्हीही तपासणार आहेत. स्वाती मालीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवल्यानंतर पोलीस पथक कारवाईत आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलीस विभवच्या घरी पोहोचले होते पण तो घरी नव्हता विभव कुठे असू शकतो याचा तपास पोलीस करत आहेत. स्वाती मालीवाल यांची रात्री सुमारे तीन तास वैद्यकीय चाचणी झाली, ज्यामध्ये एक्स-रे आणि सिटी स्कॅन करण्यात आले. स्वातीचा वैद्यकीय अहवाल आज येणार आहे. एमएलसीमध्ये स्वातीच्या चेहऱ्यावर अंतर्गत जखमा झाल्या आहेत. पोलिसांचे पथक रात्री विभवच्या घरी गेले होते, पोलिसांकडून कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. विभव कुमारने तिच्या छातीवर, चेहऱ्यावर, पोटावर आणि शरीराच्या खालच्या भागावर वार केल्याचा आरोप स्वाती मालीवाल यांनी केला आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!