भर पावसात टँकरने पाणीपुरवठा
पाणीपट्टी न भरण्याचा नागरिकांचा इशारा
सातारा
सातारा शहर आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू असूनही मंगळवार पेठेतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे ऐन पावसामध्ये अनेक अपार्टमेंटमधील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे टँकरमार्फत नागरिकांना आपल्या पाण्याची सोय करावी लागली आहे कास धरण उशाला असूनही कोरड घशाला अशा प्रकारचा अनुभव सध्या मंगळवार पेठेतील नागरिक घेत आहेत गेल्या काही दिवसापासून मंगळवार पेठेत अनेक ठिकाणी विस्कळीत आणि कमी दाबाने कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवनच विस्कळीत झाले आहे एकीकडे कास धरण ओव्हरफ्लो झाल्याच्या बातम्या येत असतानाच ते पाणी नागरिकांना वापरण्यासाठी उपलब्ध का होत नाही असा सवाल आता नागरिक करत आहेत याच कालावधीमध्ये नगरपालिकेने आपल्या नेहमीच्या कर्तव्यभावनेने रहिवाशांना पाणीपट्टीची बिले दिली आहेत मंगळवार लक्ष्मी भास्कर अपॉइंटमेंट मध्ये नगरपालिकेची तीन कनेक्शन्स असून वार्षिक 27 हजार रुपये पाणीपट्टी भरली जाते एवढे पैसे नगरपालिकेच्या तिजोरीत वार्षिक जमा होत असताना सुद्धा नागरिकांना पाणीपुरवठा व्यवस्थित केला जात नाही आणि नागरिकांना टँकरवर हजारो रुपये खर्च करावे लागत येत्या काही दिवसांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर पाणीपट्टी न भरण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे

याबाबत या भागातील सामाजिक कार्यकर्ते राजू गोरे यांच्याशी संपर्क साधला असताना ते म्हणाले,सध्या पंपिंगलाईन वरुन पाणी पुरवठा होत आहे
गणेश टाकी बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे.लवकरच व्हॉल्व्ह बसवून टाकीतून पाणी सोडण्यात येणार आहे.प्रभागातील पाणी पुरवठा व्यवस्थित करण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत.तसे झाले नाही तर आपण सर्वच जण नगरपालिकेमध्ये जाऊन आपले म्हणणे मांडू
