मुंबईत आज शक्तिप्रदर्शन
महायुती आणि इंडिया आघाडीच्या सभा
मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा 17 मे 2024 रोजी थंडवणार आहेत .लोकसभा निवडणुकीचा देशातील हा पाचवा तर महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा आहे.त्यामुळे आज महायुती आणि इंडिया आघाडीची सांगता सभा होणार आहे. महायुतीची शिवाजी पार्क तर इंडिया आघाडीची बीकेसी मैदानावर सभा होईल.
महायुतीच्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत दुसरीकडे इंडिया आघाडीने देखील कंबर कसली असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत बीकेसी मैदानावर सांगता सभा होणार आहे. इंडिया आघडीच्या या सांगता सभेला राहुल गांधी उपस्थित राहणार नाही.राहुल गांधी रायबरेली मतदार संघातून निवडणूक लढवत असून त्या ठिकाणी 20 मे रोजी मतदान आहे. यामुळे ते या सभेला उपस्थित राहणार नाही.
मुंबईत सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही गटाच्या सांगता सभा होणार असल्यातरी महायुतीच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण, या लोकसभा निवडणुकीच्या या सभेच्यानिमित्ताने राज्यात पहिल्यांना पंतप्रधान मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे एका व्यासपिठावर येत आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी मोदी-राज एकत्र आल्याची चर्चा आहे. आणि खास त्यासाठी शिवाजी पार्कची निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील ही सांगता सभा महायुतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे या सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे काय बोलता? याची अनेकांना उत्सुकता लागून आहे
