आता अँटी सेक्स बेडची चर्चा


पॅरिस ऑलम्पिक स्पर्धेच्या तोंडावर चर्चा
पॅरिस
अवघ्या दोन महिन्यात फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलम्पिक स्पर्धां भरेल.पण ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच एका निर्णयामुळे चर्चेत आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी अँटी सेक्स बेडची चर्चा सध्या जगभर पसरली आहे. या स्पर्धेतील खेळाडूंना अल्ट्रा लाईट बेड देण्यात येणार आहे.
न्यूयॉर्क पोस्टने एका वृत्तात याविषयीचा दावा केला आहे. त्यानुसार 2024 मधील ऑलम्पिक स्पर्धांमध्ये खेळाडूंचा त्यांच्या वैयक्तिक आणि सांघिक खेळावरुन फोकस हलू न देण्यासाठी हे करण्यात येत आहेत. त्यासाठीच अँटी सेक्स बेड देण्यात येणार आहे. या बेडचे मटेरियल आणि आकार असा ठेवण्यात आला आहे की खेळाडूच्या कामुकतेला चालना मिळणार नाही. एअरवेव या कंपनीने हे बेड तयार केले आहे. 2020 मधील टोकियो येथील ऑलम्पिक स्पर्धांसाठी याच कंपनीने उत्पादनं तयार केली होती.
अल्ट्रा लाईट कार्डबोर्ड बेडचा पहिल्यांदा जपानमध्ये आयोजित टोकियो ऑलम्पिकमध्ये करण्यात आला. खेळाडूंची कामुकता वाढू नये आणि त्यांचे खेळावरील लक्ष विचलित होऊ नये यासाठी हा प्रयोग करण्यात आल्याची अफवा पसरली होती. अर्थात याविषयी दोन मत प्रवाह समोर येत आहेत. एकामध्ये खेळाडूला चांगली झोप लागावी. क्रीडा प्रकारावर खेळाडूला लक्ष केंद्रीत करता यावं यासाठी या बिछान्यांचा वापर होत असल्याचा दावा करण्यात येतो. तर दुसऱ्या दाव्यात अर्थात त्यांची कामवासना रोखण्याचा प्रयोग या बेडच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येतो.

Advertisement

 


अँटी-सेक्स बेडचा मुद्दा तापल्यावर याविषयीची सत्यतेचा पडताळा केला असता कार्डबोर्ड बेडचा उद्देश कामवासनेला अटकाव करणे असल्याच्या दाव्यात कुठलेही सत्यता नसल्याचे त्यात स्पष्ट झाले. या बेडचे वजन 200 किलो आहे. त्यामुळे कामवासना कमी होण्याच्या दाव्यात काही अर्थ नव्हता. दीर्घकाळ वापरासाठी आणि पर्यावरण पूरक म्हणून या बेडचा वापर होत असल्याचे टोकियो ऑलम्पिकचे आयोजक ताकाशी किताजिमा यांनी स्पष्ट केले. पॅरिस ऑलम्पिक स्पर्धा 2024, 26 जुलै रोजी सुरु होत आहे. या स्पर्धा 11 ऑगस्टपर्यंत चालतील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!