तर त्यांच्या कानाखाली मारीन


महेश मांजरेकरांनी भरला ट्रोलर्सना दम

Advertisement

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांनी ट्रोलर्सना सज्जड दम भरला आहे.आई-मुलांना, बायकोला कोणी बोलले तर त्याचा शोध घेऊन त्याच्या कानाखाली आवाज कधीं असा दम मांजरेकर यांनी दिला आहे
महेश मांजरेकर यांचा जुनं फर्निचर हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्तानं महेश मांजरेकरांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ट्रोलिंगविषयी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “ट्रेलिंगचा मला भयंकर राग येतो. लोक म्हणतात दुर्लक्ष करा. पण तुम्हाला हक्क कोणी दिला. मी तुमच्याबद्दल कधी वैयक्तिक बोलता का? मी फक्त एक सिनेमा बनवतो. तो तुम्ही पाहता. तुम्ही त्यासाठी पैसे दिले आहेत. त्यामुळे सिनेमा आवडला की नाही सांगणं तुमचं काम आहे. तुम्ही माझ्यावर क्रिटिसाइज केलं तर माझं काहीही म्हणणं नाही. पण तुम्हाला माझ्या आई-मुलांना, बायकोला बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. मी चवताळलेल्या माणसासारखा शोधेन आणि कानफटवेन”.
महेश मांजरेकर पुढे म्हणाले, “मी माझ्या मुलीवर केलेली भीषण कमेंट एकदा वाचली होती. मी त्याला शोधलं आणि त्याची तक्रार केली. तुम्ही माझ्या कामावर बोला पण माझ्या आई-मुलांना का बोलता? मी तुम्हाला वैयक्तिक कधी काही बोललो आहे का? हे सगळं तेव्हाच संपेल जेव्हा सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट्स करण्यांविरोघात एक कायदा केला जाईल”.
महेश मांजरेकर यांचा जुनं फर्निचर हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात महेश मांजरेकर यांच्याबरोबर मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे हे कलाकार प्रमुख भुमिकेत आहेत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!