घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळले


अनेकजण अडकल्याची भीती

मुंबई
मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी सायंकाळी अचानक धुळीचे वादळ आले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात अपघातांची मालिका घडली. घाटकोपर परिसरातील छेडा नगरात होर्डिंग कोसळून भीषण अपघात घडला असून या ठिकाणी पेट्रोल पंपावर पाऊस थांबण्याची वाट पाहणारे शंभरहून अधिक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे बचावासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. बचावाचे काम रात्रभर चालणार आहे. आतापर्यंत ढीगाऱ्या खालून 35 हून अधिक नागरिकांना ढीगाऱ्या खालून बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमीची रवानगी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात करण्यात आली आहे.
मुंबई महानगरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास धुळीच्या वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी झाली. मुंबईकर आपआपल्या दैनंदित व्यवहारात व्यस्त असाताना अचानक कोसळलेल्या पावसाने घाटकोपर येथील होर्डींग कोसळून त्यांच्या खाली अनेक वाहने अडकली आहेत. पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची गर्दी या पेट्रोल पंपावर असतानाच अचानक हे भले मोठे जाहीरातीचे होर्डींग कोसळल्याची घटना घडली. या ढीगाऱ्याखाली वाहनांसह चालक तसेच प्रवासी आणि पावसाने आडोशाला उभे असलेले नागरिक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आदेश जारी केले आहे. अपघातग्रस्तांना आवश्यक मदत मिळावी यासाठी उपाययोजना करण्यासाठी मुंबई पालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी स्वत: महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Advertisement

घटनास्थळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी या स्वतः उपस्थित राहून महानगरपालिका आणि इतर बचाव यंत्रणांना निर्देश देत आहेत. या ठिकाणाहून आतापर्यंत 35 पेक्षा अधिक नागरिकांना ढीगाऱ्याखालून बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. या सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी 20 पेक्षा अधिक रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!