आईनेच केला मुलीचा खून


परीक्षेत नापास झाल्याने एकमेकींना भोसकले
बंगळुरू
अभ्यासाच्या तणावावरुन कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका महिलेने तिच्या मुलीची हत्या केली आहे. मुलीला मिळालेल्या कमी मार्कांवरुन आईने मुलीला मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला. तर तिच्या आईला बंगळुरुमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये बाणशंकरी पोलीस स्टेशनचे अधिकारी चौकशी करत असून प्राथमिक चौकशीमध्ये मुलगी परिक्षेमध्ये 5 विषयांमध्ये नापास झाल्याच्या मुद्द्यावरुन आईने तिला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचं समोर आलं आहे.
सोमवारी, बंगळुरुमधील शास्त्रीनगर परिसरामध्ये पद्मजा नावाच्या 60 वर्षीय महिलेने तिच्या साहित्या नावाच्या 19 वर्षीय मुलीला भोसकलं. या दोघींमध्ये परीक्षेतील मार्कांवरुन तुफान वाद झाला साहित्याला अभ्यासामध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या. यावरुनच अनेकदा या दोघींमध्ये वाद व्हायचे. पद्मजा यांच्या पतीचं निधन झालं आहे. मुलगी साहित्याला शिकता यावं यासाठी पद्मजा यांनी त्यांच्या मालकीच्या कंपन्याही विकल्या होत्या. साहित्या अभ्यासामध्ये फार यश मिळवले अशी अपेक्षा पद्मजाला होती.साहित्या आणि पद्मजामध्ये अभ्यासावरुनच वाद झाला आणि या वादातच दोघींनी एकमेकांवर चाकूने हल्ला केला. दोघींनाही गंभीर जखमा झाल्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या साहित्याचा मृत्यू झाला. तर पद्मजाच्या लिव्हरला गंभीर इजा झाली आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून तिला अतीदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. पोलिसांनी प्राण बचावलेल्या पद्मजाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर पद्मजाची सविस्तर चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!