जीवनाचे गणित सोडवणारे शास्त्र म्हणजे गीता
ज्ञानयज्ञ उपक्रमात डॉ सुभाष आगाशे यांचे प्रतिपादन
सातारा
आध्यात्म शास्त्राचा योग्य अभ्यास करून सुख शांती समाधान मिळवता येते सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचे गणित सोडवणारे शास्त्र म्हणजे गीता आहे असे प्रतिपादन डॉ सुभाष आगाशे यांनी केले
बाळासाहेब शिवदे यांच्या जन्मशताब्दी सांगता सोहळानिमित्त आयोजित ज्ञानयज्ञ उपक्रमात आध्यात्म म्हणजे काय या विषयावरील प्रवचनात ते बोलत होते
डॉ सुभाष आगाशे म्हणाले,गीतेच्या माध्यमातून हे जीवनाचे गणित सोडवताना काही मूलभूत संकल्पना स्पष्ट व्हायला हव्यात त्यासाठी माणसाने प्रथम स्वतःला ओळखावे. मी कोण आहे मी कशासाठी आहे या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करायला हवा
आध्यात्म हा अनुभव घेण्याचा विषय आहे असे सांगून डॉ आगाशे म्हणाले,देवाचा शोध घेणे सोपे नाही त्यासाठी साधनेचे परिश्रम करावे लागतात गीता हा धर्मग्रंथ नाही गीता केवळ हिंदू धर्मासाठी मार्गदर्शक पुस्तक नाही तर सर्वच धर्मासाठी ते मार्गदर्शक पुस्तक आहे कारण गीतेमध्ये सामान्य लोकांनी प्रपंच करून सुख शांती कशी मिळवावी याबाबट मूलभूत मार्गदर्शन आहे प्रपंच करू नका असे गीतेत कोठेही म्हटलेले नाही उलट गीता प्रपंच करणाऱ्या लोकांनाच मार्गदर्शन करते
प्रत्येक माणसाच्या हृदयात देव वसला असताना देवाचा शोध मात्र बाहेर घेतला जातो असेही यावेळी डॉ आगाशे यांनी स्पष्ट केले

आध्यात्म म्हणजे काय या विषयावरील हा ज्ञानयज्ञ १४ जूनपर्यंत चालू राहणार आहे
सायंकाळी सहा वाजता श्रद्धा बंगला पिरवाडी रोड येथे हि प्रवचनमाला सुरु आहेजीवनाचे गणित सोडवणारे
