सॅमसन,शिवम दुबे,यशस्वीला संधी
उपकर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे
मुंबई : जून महिन्यापासून आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 ला सुरुवात होणार असून यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने संघाची घोषणा करताना रोहित शर्माचा भविष्यातील उत्तराधिकारी कोण असणार याबाबतही मोठे संकेत दिले आहेत.कारण उपकर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे देण्यात आली आहे
मंगळवार 30 एप्रिल 2024 रोजी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. अहमदाबादमध्ये बैठकीनंतर संघाची घोषणा करण्यात आली असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या 15 सदस्यांचा संघ जाहीर झाला आहे. यामध्ये मागील अनेक दिवसांपासून टीम इंडियामधून बाहेर असणाऱ्या 4 खेळाडूंना संधी देण्यात आलेली आहे. तर काही स्टार खेळाडूंना यातून वगळण्यात आले असून त्यांना मोठा धक्का बसला आहे.
टी२० वर्ल्ड कपचे आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. 1 जून ते 29 जून या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताने 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला असून त्यात 4 खेळाडू स्टँडबायवर ठेवण्यात आले आहेत. यात शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान यांचा समावेश आहे.
बीसीसीआयने वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करत असताना रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवलं आहे. त्याबरोबरच रोहित शर्माचा पुढचा उत्तराधिकारी कोण असेल याचेही संकेत दिले आहेत. जून महिन्यापासून होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी बीसीसीआयने रोहितवर कर्णधार तर हार्दिक पंड्यावर उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे रोहितनंतर बीसीसीआय हार्दिक पंड्याकडे त्याचा उत्तराधिकारी म्हणून पाहत असल्याचे दिसत आहे. हार्दिक पंड्याने आतापर्यंत टीम इंडियाकडून टी 20 चे 92 सामने खेळले असून यात 1348 धावा केल्या आहेत, तर ऑलराऊंडर असलेल्या हार्दिकने टी 20 मध्ये 73 विकेट्स घेतले. हार्दिक पंड्या यापूर्वी 2 022मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी २० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग होता.
भारतीय संघ
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज,
राखीव : शुभमन गिल, रिंकु सिंग, खलील अहमद, आवेश खान
