महाराष्ट्रभर संघर्ष करु


शशिकांत शिंदे प्रकरणी शरद पवारांचा इशारा
सातारा
“झारखंडचे मुख्यमंत्री, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे संजय राऊत सामना मधून सरकारवर टीका करतात यांनाही काही गुन्हा नसताना तुरुंगात टाकले. तसेच आमचे सातारचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही वाट बघतोय, शशिकांत शिंदेंना अटक केल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, महाराष्ट्रभर संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी दिला.
माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांची आज दहिवडी येथील बाजार पटांगणावर जाहीर सभा झाली माढ्याचे उमेदवार धैर्यशिल मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भूषणराजे होळकर, प्रभाकर देशमुख आदी नेते या सभेला उपस्थित होते. या सभेत बोलताना शरद पवार यांनी हा इशारा दिला

Advertisement

शरद पवार म्हणाले, शशिकांत शिंदे बाजार समितीमध्ये चांगलं काम करत आहेत. काहीही करून शशिकांत शिंदे यांना अडवायचं कसं ? त्यांना थांबवण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न सुरू आहेत. जर त्यांनी शशिकांत शिंदे यांना अटक केली तर संपूर्ण सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रात संयमाने आणि लोकशाही मार्गाने आम्ही लढा उभारू हा अन्याय महाराष्ट्र सहन करत नाही हे उदाहरण या ठिकाणी दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!