जर्मनीत भारतीय विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी


700,000 रिक्त पदांवर नोकरीची संधी,

Advertisement

नवी दिल्ली : जर्मनी ही अमेरिका आणि चीन नंतर जगातील तिसरी मोठी इकॉनमी असून यूरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. पण देश सध्या वाढती लोकसंख्या आणि कामगार कमतरताअसा दुहेरी संकटाच्या उंबरठ्यावर उभा राहीला आहे ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भारतातील बरेच विद्यार्थी जर्मनी सारख्या देशांमध्ये शिकायला जातात तर, सध्या जवळपास ४३,००० भारतीय विद्यार्थी जर्मनीमध्ये शिकत असून आयटी आणि इंजीनियरिंगच्या क्षेत्रात डिगरी असलेल्या या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची खबर समोर आली आहे.लेबर शॉर्टेजच्या समस्येमुळे जर्मनी भारतीय विद्यार्थ्यांना आपल्यासोबत जोडण्याचा विचार करत आहे आणि त्यासाठी नियमांमध्ये बदलाव करण्याच्या तयारीत आहे. या संधीचा फायदा तिथे शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना होऊ शकतो. या देशात जवळपास ७००,००० पर्यत पदांवर संधी असून ७० लाखांपर्यत स्किल्ड वर्कर्ससाठी जागा आहे.
जर्मनीने कॅनडासारख्या देशांकडून शिकण्याची गरज आहे, ज्यांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात सामावून घेण्याची धोरणे आखली आहेत. जर्मनीच्या लोकसंख्येत झालेली घट अधिक गंभीर बनत चालली असुन देशातील जन्मदर केवळ १.४ आहे. अशा वेळी देशासाठी आंतरराष्ट्रीय टॅलेंटची गरज भासू लागली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!