इलॉन मस्क यांचा भारत दौरा रद्द
नवी दिल्ली
टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क २१ आणि २२ एप्रिल रोजी भारताचा दौरा करणार होते. १० एप्रिल रोजी इलॉन मस्क यांनी स्वत: याची माहिती दिली होती होती. पण आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मस्क यांनी आपला दौरा रद्द केलाय.त्यांचा हा दौरा रद्द होण्यामागचं कारण समजू शकलेलं नाही. इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक आणि ड्रायव्हरलेस कार निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. भारताने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची नीती राबवली आहे. त्याच भूमिकेतून भारत सरकारने एक नवी इलेक्ट्रिक वाहन निर्मिती नीतीची घोषणा केली आहे. मेक इन इंडिया अंतर्गत इलेक्ट्रिक कार कंपन्यांना टॅक्समधून दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यादृष्टीकोनातून इलॉन मस्क यांचा भारत दौरा महत्त्वाचा होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, इलॉन मस्क यांनी भारतात २० ते ३० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात ते लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर ही घोषणा होण्याची दाट शक्यता होती. पण, तुर्तास याबाबतची घोषणा पुढे ढकलली आहे असंच म्हणावं लागेल. पंतप्रधान मोदी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की ते आतापर्यंत दोनवेळा मस्क यांना भेटले आहेत. मस्क यांना भारतामध्ये गुंतवणूक करायची आहे
