शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांची माघार


निवडणूक न लढवण्याचा निर्णय
बीड : लोकसभा निवडणुकीतून शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांनी माघार घेतली आहे. बीड मतदारसंघात ज्योती मेटे या निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होत्या.
ज्योती मेटे अपक्ष निवडणूक लढवणार का? त्यांनी निवडणूक लढवण्याचे ठरवल्यास कोणाला फटका बसणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. ज्योती मेटे यांनी आता निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय. बीडमध्ये महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे यांना तिकिट देण्यात आलं आहे. तर पंकजा मुंडे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे मैदानात आहेत.
शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा डॉ ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र समाजाचे व्यापक हित लक्षात घेता आणि मतविभाजनाचा धोका लक्षात घेता ज्योती मेटे यांनी लोकसभेमधून माघार घेतली.
बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. तसेच राज्यात शिवसंग्रामच्या भूमिके संदर्भात लवकरच प्रदेश पातळीवरून निर्णय घेतला जाईल असं देखील त्या म्हणाल्या. त्यामुळे ज्योती मेटे यांनी माघार घेतल्यामुळे नेमका फायदा कुणाचा आणि तोटा कोणाचा यावर बीड मधील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!