क्विक हिल सायबर शिक्षा व सुरक्षा अभियानात विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश


सातारा
कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च मधील संगणक शास्त्रातील चार विद्यार्थ्यांची क्विक हिल फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. या अभियानात काम करण्यासाठी प्राध्यापिका.सौ. तेजश्री शेवते , क्लब ऑफिसर श्रेयश वाघमारे, प्रतीक जाधव, अदिती चव्हाण, जयंता पवार या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांचे ट्रेनिंग दि. १२ जून रोजी विमाननगर (पुणे) येथील क्विक हील कंपनीच्या ऑफिसमध्ये नुकतेच पार पडले. या ट्रेनिंग सेशन दरम्यान विद्यार्थ्यांना प्रोग्राम समन्वयक अजय शिर्के, सुगंधा दाणी, गायत्री पवार यांनी मार्गदर्शन केले. क्विक हिलच्या चेअर पर्सन अनुपमा काटकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट सायबर सुरक्षेबाबत जागृती वाढविणे व शिक्षण देणे हे आहे.कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च व क्विक हिल फाउंडेशनच्या भागिदारिमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार असून डिजिटल व्यवहार सुरक्षित करण्यात मदत होणार आहे. हे विद्यार्थी विविध सामाजिक घटकांना मार्गदर्शन करून त्यांच्यात सायबर जागृकता निर्माण करण्याचे कार्य करणार आहेत.
अभियानासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की, निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक वाटचाली बरोबरच सामाजिक जबाबदारीही पार पाडावी. तिसरे वर्ष आहे ज्यामध्ये विद्यालय क्विक हिल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सायबर जागरूकता अभियान राबवत आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ बी एस सावंत, विभाग प्रमुख, डॉ.आर.डी.कुंभार यांनी पुढील वाटचालीस मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!