ब्रेकफास्ट स्पेशल
आजचा मेनू
फोडणीचा पाव
ब्रेड अथवा पाव नुसता सकाळी नाश्त्याला खाण्यापेक्षा तुम्ही त्याला फोडणी देऊन खाल्लंत तर अधिक चांगली चव येते.
साहित्य –
रेड अथवा पाव (तुमच्या अंदाजाप्रमाणे),तेल,कांदा,फोडणीचं साहित्य,चवीनुसार मीठ,मिरची,कोथिंबीर
कृती
ब्रेड अथवा पाव व्यवस्थित कुस्करून घ्या मीठ त्यावरच तुमच्या अंदाजानुसार घाला मिरचीचे तुकडे करून घ्या. एका कढईत तेल ओता. त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, कडिपत्ता घाला, त्यात चिरलेला कांदा आणि मिरच्यांचे तुकडे घालून व्यवस्थित परतून घ्या. कांदा शिजत आल्यावर वरून ब्रेड अथवा पावाचा चुरा घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. चिरलेली कोथिंबीर वरून पेरा आणि एक वाफ काढून गरमगरम फोडणीचा पाव सॉसबरोबर खायला द्या.
