वार्षिक राशिभविष्य २०२४ मीन रास


मीन रास

संमिश्र प्रकारचे वर्ष

Advertisement

न्यूज मंडीच्या वाचकांना नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
मीन राशीचे लोक अत्यंत दयाळू असतात. ते इतरांना नेहमी मदत करण्यासाठी तत्पर असतात. त्यांचा स्वभाव खूप शांत असल्यामुळे त्यांना जास्त बोलायला आवडत नाही. त्यांना एकटे राहायला आवडते.हे लोक स्वत:च्या दुनियेत मग्न असतात. त्यांना अनेक कला अवगत असतात. त्यांना साहित्य, कला व संगीतामध्ये आवड असते. अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीचा खंबीरपणे सामना करतात.या लोकांना समजून घेणे खूप कठीण असते. त्यांचा स्वभाव परिस्थितीनुसार बदलत असतो. खूप जास्त मुडी असलेले हे लोक धार्मिक कार्यात मनापासून सहभागी होतात आणि समाजाची सेवा करणे त्यांना खूप आवडते.ते कोणत्याही नात्याविषयी खूप जास्त सीरियस असतात आणि नात्यात प्रेम, काळजी, विश्वास शोधतात. खूप जास्त रोमँटिक असलेल्या या व्यक्तींना त्यांच्या पार्टनरकडून भरपूर अपेक्षा असतात. ते नेहमी पार्टनरला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात.
वर्षाच्या सुरुवातीला बाराव्या स्थानात असणारी शनी मंगळ युती अचानक अडचणी आणि खर्च उद्भवू शकतात त्यानंतर मात्र नोकरदारांना नोकरीत जाणवणाऱ्या अडचणी दूर होतील स्वतंत्र व्यावसायिकांना मोठ्या संधी मिळतील परदेशाशी संबंधित व्यापार करणाऱ्यांना चांगले लाभ मिळतील ग्रहणाजवळ मानसिक स्वास्थ्य जपा विद्यार्थ्यांना वर्ष चांगले जाईल शुभ ग्रहांचे यावर्षी पाठबळ असले तरीही साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे हे विसरून चालणार नाही त्यामुळे हे वर्ष मीन राशींना संमिश्र प्रकारचे जाईल
एप्रिल 2024 पर्यंत राशी स्वामी गुरु तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करतील जे फारसे अनुकूल राहणार नाही शनि वर्षभर तुमच्या 12 व्या स्थानी भ्रमण करणार आहे ज्यामुळे तुमच्या प्रत्येक कामात विलंब निर्माण होईल याखेरीज छायाग्रह राहू आणि केतू तुमच्या प्रथम आणि सप्तम स्थानातून भ्रमण करतील यावर्षी तुमच्या साडेसातीला सुरुवात झाली आहे त्यामुळे करियर आरोग्य नातेसंबंध आणि आर्थिक बाबी यावर त्याचा परिणाम होऊ शकतो एप्रिल 2024 पर्यंतचा काळ अनुकूल राहील याच काळात आर्थिक बाबतीतले महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकता याच काळात तुम्ही एखादी मोठी गुंतवणूक ही करू शकता गुरुचे द्वितीय स्थानातील भ्रमण हे चांगले धनलाभाचे संकेत घेऊन येत आहेत व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनाही हा काळ चांगला जाईल नातेसंबंध चांगले राहतील अध्यात्मिक कार्याकडे ओढा राहील जोडीदाराशी संबंध चांगले राहतील राहू आणि केतू मुळे काहींना करियर मध्ये अचानक बदल करावे लागतील मे 2024 नंतर तृतीय स्थानातून भ्रमण करणाऱ्या गुरूमुळे आर्थिक चिंता वाढतील काहींना कर्जही काढावे लागेल 29 जून ते 15 नोव्हेंबर 2024 या काळात शनी वक्री होणार आहेत त्याचा फारसा अनुकूल परिणाम मिळणार नाही
2024 मध्ये करिअर मध्ये फारसे बदल होणार नाहीत करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी तुम्हाला खूप धीराने आणि शांततेने काम करावे लागेल मे 2024 नंतर नोकरीमध्ये किंवा करिअरमध्ये तुम्हाला परिवर्तन किंवा स्थान परिवर्तन करावे लागेल करिअरमध्ये वरिष्ठांची शाबासकी यावर्षी तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला कामात फारसा आनंद वाटणार नाही एप्रिल नंतर करिअर संबंधित कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका 29 जून ते 15 नोव्हेंबर 2024 मध्ये शनी वक्री राहणार आहे या काळात आपल्या कामावर जास्त लक्ष देणे आवश्यक आहे
मे 2024 नंतर आर्थिक स्थिती फारशी चांगली राहणार नाही खर्च वाढण्याची शक्यता आहे एप्रिल 2024 पूर्वी केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल त्याचा उपयोग मे नंतरच्या काळात होईल साडेसातीमुळे खर्च जास्त आणि कमाई कमी यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागेल
एप्रिल 2024 पर्यंत विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक यश मिळेल मे 2024 नंतर मात्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती चा वेग कमी असेल एकाग्रतेचा अभाव असल्यामुळे ही विद्यार्थी फारशी प्रगती करू शकणार नाहीत
मे 2024 नंतर कौटुंबिक जीवन फार सकारात्मक राहणार नाही परंतु एप्रिल 2024 पर्यंत कुटुंबात आनंद आणि प्रेम राहील तृतीयात भ्रमण करत असलेल्या गुरूमुळे कुटुंबात संवाद कमी आणि अहंकारामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात राहू केतू या समस्या वाढवण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे कुटुंबात चांगले वातावरण राहणार नाही कुटुंबात एकमेकांना समजून न घेतल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात
हे वर्ष प्रेम आणि विवाहासाठी फारसे अनुकूल नाही तरीही ज्यांना विवाह करायचा आहे त्यांनी एप्रिल 2024 पूर्वी विवाह करावा
एप्रिल 2024 पर्यंत तुमचे आरोग्य चांगले राहील पण त्यानंतर डोळ्यांची आग होणे दात दुखी आणि पचना संबंधित काही समस्या उद्भवू शकतात कामासाठी केलेल्या प्रवासामुळे ही तुम्हाला ताणतणात जाणवू शकतो पाय दुखी गुडघेदुखी जाणवू शकते त्यामुळे स्वतःला शांत आणि तणावमुक्त ठेवण्यासाठी रोज ध्यान किंवा योग करणे फायदेमंद राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!