वार्षिक राशिभविष्य २०२४ कुंभ रास


कुंभ रास

Advertisement

आरोग्याची काळजी घ्यावी लागेल
न्यूज मंडी च्या वाचकांना नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
कुंभ राशीचे लोक आत्मविश्वासू आणि दृढनिश्चयी असतात. ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे या राशीचा स्वामी ग्रह हा शनि असतो. त्यामुळे या राशीवर शनिदेवाची विशेष कृपा असते.या राशीचे लोक कोणतेही नाते मनापासून निभावतात. त्यांचे वैवाहिक आयुष्य खूप सामान्य असते. ते खूप प्रामाणिक असतात. त्यांना मनाप्रमाणे जोडीदार मिळतो; जो त्यांना नेहमी समजून घेतो.त्यांना नेहमी इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करायचे असते. त्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित होत असतात. हे लोक खूप भावनिकही असतात; मात्र त्यांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत.ज्योतिषशास्त्रानुसार, १२ राशींच्या तुलनेत कुंभ राशीचे लोक सर्वांत जास्त दयाळू स्वभावाचे असतात. हे लोक इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात.कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव समजून घेणे खूप कठीण आहे. हे लोक अनेक गोष्टी इतरांपासून लपवून ठेवतात; ज्यामुळे त्यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे अनेकदा समजून घेणे अवघड जाते.
वर्षाच्या सुरुवातीला तुमच्याच राशीत होणाऱ्या शनिमंगळ युतीमुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल रोजच्या जीवनात कायद्याचं आणि नियमांचे उल्लंघन करू नका बाकी साडेसाती असली तरीही नोकरदारांना वर्ष उत्तम जाईल विवाह इच्छुकांचे विवाह होतील ग्रहणांच्या दरम्यान आरोग्याची काळजी घ्यावी लागेल व्यावसायिकांना अनेक संधी मिळतील कलाकारांना चांगले काम मिळू शकेल एकूणच हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांसाठी संमिश्र प्रकारचे जाईल.
एप्रिल 2024 पर्यंत गुरु तुमच्या तृतीय स्थानातून भ्रमण करेल आणि मे 2024 मध्ये गुरु तुमच्या चतुर्थस्थानातून भ्रमण करतील शनि वर्षभर तुमच्याच राशीत भ्रमण करतील तुमच्याच राशीत असलेल्या शनी मुळे अनेक समस्या आणि अडचणी वर्षभर सामना करावा लागेल कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील तुमचा जास्तीत जास्त वेळ प्रवासात जाईल शनीची सप्तमावर दृष्टी असल्याने जोडीदार किंवा पार्टनरशी संबंध तणावपूर्ण राहतील जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तरीही पार्टनरशी संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा तुमच्या मित्रांच्या समस्या सुद्धा तुम्हाला सोडवाव्या लागतील त्याचाही तुम्हाला त्रास होऊ शकतो शनीचे प्रथम स्थानातील भ्रमण म्हणजे तुमच्या खांद्यावर खूप मोठा भार असल्यासारखे वाटेल राहू द्वितीय स्थानात तर केतू अष्टमस्थानात राहील यामुळेही तुम्ही अनावश्यक चिंता कराल असुरक्षिततेची भावना त्यामुळे जास्त वाढेल तृतीय स्थानातील गुरूमुळे कुटुंबात संपत्ती संबंधी वादविवाद होऊ शकतात या समस्यांमुळे कदाचित तुम्हाला नवीन घरात शिफ्ट व्हावे लागेल या ताणतणावाचा नकारात्मक परिणाम आरोग्यावर होऊ शकतो एक मे 2024 ला गुरु तुमच्या चतुर्थस्थानात प्रवेश करेल त्याचा सकारात्मक परिणाम घरातील समस्यांवर आणि संबंधांवर होईल जर तुम्ही व्यापार करत असाल तर या काळात चांगला फायदा मिळेल मे महिन्यात व्यवसायाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेणार असाल तर तो सकारात्मक ठरेल 29 जून ते 15 नोव्हेंबर 2024 शनी वक्री राहणार आहे त्याचा परिणाम नोकरी धनलाभ आणि जीवनाच्या इतर क्षेत्रावरही पडेल
शनीचे प्रथम स्थानातील भ्रमण यामुळे नोकरी जाणे किंवा चांगल्या संधीसाठी नोकरीत बदल करणे असाही होऊ शकतो जर तुम्ही एखाद्या नवीन प्रोजेक्टचे नेतृत्व करत असाल तर त्यात अनेक समस्या निर्माण होतील आणि तो पूर्ण व्हायला बराच वेळ लागेल त्यामुळे करिअर शी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय यावर्षी घेऊ नका एक मे 2024 नंतर चतुर्थात येणारा गुरु करिअर साठी अनुकूल राहील
एप्रिल 2024 पर्यंत आर्थिक स्थिती फारशी चांगली राहणार नाही तुम्हाला तुमच्या कमाई पेक्षाही जास्त खर्च करावा लागेल मी 2024 नंतर आर्थिक स्थिती बऱ्यापैकी सुधारेल परंतु तरीही तुमचे खर्च वाढते राहतील कुटुंबासाठी खर्च करावा लागेल कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करताना कदाचित तुम्हाला उधारीही करावी लागेल खर्च खूप वाढल्याने तुम्हाला कर्ज काढावे लागेल त्यामुळे तुमच्यावर चा आर्थिक बोजा वाढेल
यावर्षी विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात लागणार नाही त्यामुळे शिक्षणात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास करण्यासाठी मेहनत करावी लागेल एप्रिल 2024 नंतर विद्यार्थ्यांना परीक्षेत थोडीफार यश मिळू शकेल
कुटुंबातील अनेक समस्यांमुळे कौटुंबिक जीवन फारसे आनंददायी असणार नाही तरीही तुम्हाला कुटुंबातील सदस्यांवर विशेष लक्ष देऊन घरातील वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल घरातील किरकोळ वादाचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊ शकते काय नाही कुटुंबात संपत्ती तसेच काही कायदेशीर वाद जन्म घेऊ शकतात ज्यामुळे नातेसंबंधांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो एप्रिल 2024 नंतर या समस्या कमी होऊ शकतात
यावर्षी विवाह करणार असाल तर तो टाळण्याचा सल्ला देऊ शकतो विवाहाचा निर्णय मे 2024 नंतर घेणे उचित ठरेल
यावर्षी तुमच्या आरोग्यात ताण तणावामुळे गुडघेदुखी आणि सांधेदुखी इत्यादी तक्रारी जाणवतील मे 2024 नंतर तुमच्या आरोग्यात चांगले बदल होतील परंतु तुम्हाला आईच्या आरोग्यावर बराच खर्च करावा लागेल कामासाठी करावा लागणारा प्रवास तुमच्यासाठी अनेक ताणतणाव आणि आरोग्याच्या तक्रारी निर्माण करेल


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!