वार्षिक राशिभविष्य २०२४
वार्षिक राशिभविष्य २०२४

कर्क
अनेकांचा भाग्योदय होईल
न्यूज मंडीच्या वाचकांना नवीन मराठी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येणारे नवीन वर्ष हे तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे याच महिन्यात होणाऱ्या शनी मंगळ युतीमुळे अनेकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागेल काहींना नोकरी व्यवसायात शत्रुपीडा जाणवू शकते तर काहींची अचानक बदली होऊ शकते येणाऱ्या वर्षात अनेकांचा भाग्योदय होईल तर काहीजण नवीन वास्तू मध्ये प्रवेश करतील येणाऱ्या ग्रहणांच्या पार्श्वभूमीवर सर्वच कर्क राशीच्या व्यक्तींनी सार्वजनिक जीवनात नियमांचे उल्लंघन करू नये लाभातील गुरु नोकरीत आणि व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी प्राप्त करून देईल
ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीचे लोक खूप भावनिक असतात आणि ते दुसऱ्यांचा खूप जास्त विचार करतात. त्यांचा स्वभाव खूप कठोर असतो; पण अनेकदा हे लोक परिस्थितीनुसार भावूकसुद्धा होतात.या राशीचे लोक खूप प्रामाणिक आणि दयाळू स्वभावाचे असतात. त्यांच्या स्वभावात विरोधाभास दिसून येतो. जर त्यांचा मित्र त्यांच्या मनाप्रमाणे वागत नसेल, तर हे लोक त्यांची निंदाही करू शकतात.या राशीचे लोक खूप स्वाभिमानी असतात. त्यांना नेहमी समाजात आदर, सन्मान हवा असतो. या राशीच्या लोकांना कुणीही मूर्ख बनवू शकत नाही. कारण- हे लोक खूप हुशार आणि चपळ असतात.ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचे लोक त्यांच्या आयुष्यात नात्यांना खूप महत्त्व देतात. कुटुंबाला हे लोक सर्वस्व मानतात. पार्टनरसाठी हे लोक वाट्टेल ते करायला तयार असतात. या राशीच्या लोकांना आपल्या पार्टनरकडूनही भरपूर अपेक्षा असतात. या राशीचे लोक रोमँटिकसुद्धा असतात.
1 मे 2024 पर्यंत गुरु आपल्या राशीच्या दशम स्थानात गोचर करणार असून त्यानंतर ते लाभस्थानात गोचर करतील दशम स्थानातून गोचर करत असताना आर्थिक बाबतीत आणि करिअर बाबतीतही तुम्हाला प्रगतीपथावर राहता येईल शनी संपूर्ण वर्षभर तुमच्या अष्टमस्थानात राहील राहू आणि केतू चा भाग्यस्थानात आणि तुमच्या तिसऱ्या स्थानातून भ्रमण होईल त्यामुळे तुमचा ओढा अध्यात्मिक गोष्टींकडे जास्त राहील यावर्षी तुम्हाला अनेक प्रवास करावे लागतील
अष्टमातील शनी मुळे नोकरदारांना नोकरीत काही अडचणी येऊ शकतात येऊ शकतात नोकरीत अचानक बदली होऊ शकते काहीजणांची नोकरी ही जाऊ शकते परंतु एप्रिल नंतर गुरु अनुकूल झाल्यावर नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात या खेरीज 29 जून ते 15 नोव्हेंबर 2024 या कालावधीत शनी वक्री राहील या काळात नोकरदारांनी जागरूक राहून आपले काम प्रामाणिकपणे करावे लागेल
एप्रिल 2024 पर्यंत आर्थिक बाबतीत चांगले लाभ ही होतील परंतु तितकाच खर्चही वाढेल एक मे 2024 नंतर गुरु लाभात आल्यावर आर्थिक आघाडीवर तुम्हाला चांगले यश मिळेल तसेच धन संचयही करता येईल परंतु तरीही अष्टमातील शनीची धन स्थानावर असणारी दृष्टी मुळे अचानक खर्च उद्भवू शकतात प्रवास करताना काळजी घ्यावी लागेल
विद्यार्थ्यांना एप्रिल 2024 पर्यंत जास्त एकाग्रतेने अभ्यास करावा लागेल त्यानंतर मात्र विद्यार्थ्यांना चांगले यश मिळू शकेल भाग्यस्थानातील राहूमुळे अभ्यासात लक्ष कमी लागेल
एप्रिल 2024 पर्यंत कुटुंबात काही वाद विवाद होऊ शकतात वडीलारजीत संपत्ती विषयी कुटुंबात भांडणे वादविवाद होऊ शकतात त्यामुळे कौटुंबिक बाबतीत सामंजस्याची भूमिका घेणे हिताचे ठरेल
अष्टमातील शनी मुळे प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनही फारसे अनुकूल राहणार नाहीअष्टमातील शनी मुळे डोळे दुखणे पाय दुखणे स्वभाव चिडचिडा होणे इत्यादी किरकोळ तक्रारींना सामोरे जावे लागेल परंतु तरीही आपल्या आरोग्याची काळजी घेणे नियमित जेवण व्यायाम करणे तसेच योगासने आणि ध्यान करून मनावरचा ताण कमी करणे यामुळेही तुमचे आरोग्य चांगले राहू शकते
