साताऱ्यात बुधवारी हिंदी,मराठी गीतांचा कार्यक्रम


दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजन

Advertisement

सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाहूपुरी शाखेच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त सुरसंगम ग्रुपचा सदाबहार नगमे हा हिंदी मराठी गीतांचा सुरेल कार्यक्रम बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे सादर केला जाणार आहे.सुर संगम ग्रुप चा हा 96 वा कार्यक्रम असून कार्यक्रमाची संकल्पना युनूस शेख व शहाबुद्दीन शेख यांची आहे .या कार्यक्रमाचे निवेदन राजेश वंजारी करणार असून ऑडिओ व्हिडिओ संकलनाचे काम कलाकार स्टुडिओ सातारा यांच्यातर्फे केला जाणार आहे. ध्वनी व्यवस्था युनूस शेख सांभारणार आहेत.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिरीष चिटणीस, श्रीराम नानल,मुकुंद फडके, विनायक भोसले, रवींद्र कळसकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी युनूस शेख, शहाबुद्दीन शेख राजेश वंजारी, स्वाती शेंडगे रमिजा सय्यद, जास्मिन शेख, सुनील धनवडे, साधना धनवडे, मीना गोंदकर, तुषार पाटील, अमोल जाधव, मुन्नाभाई, नासिर पालकर ,कपिल राऊत हे गायक कलाकार विविध हिंदी व मराठी गाणी सादर करणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन शिरीष चिटणीस आणि सुरसंगम ग्रुपचे शेख बंधू यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!