वार्षिक राशिभविष्य २०२४
वार्षिक राशिभविष्य २०२४

मिथुन
आर्थिक बाबतीत संघर्ष
ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीचे लोक अत्यंत बुद्धिमान आणि स्वतंत्र विचारांचे असतात आणि ते कोणत्याही प्रकारच्या संकटांना सहज सामोरे जातात.मिथुन राशीचे लोक अतिशय आकर्षक असतात आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ते खूप मजबूत असतात, असे मानले जाते. असं समजलं जातं की त्यांना त्यांच्या आयुष्यात सतत काही तरी नवीन करावे, असे वाटते आणि या राशीचे लोक बुद्धिमत्तेला अधिक महत्त्व देतात.या राशीचे लोक अष्टपैलू असतात आणि यांना अनेक कला अवगत असतात, असे म्हणतात. त्यांच्या बोलण्याच्या अनोख्या शैलीने ते इतरांना सहज आकर्षित करतात, असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार जरी हे लोक दिसायला आकर्षित असले तरी या व्यक्तींना आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते..
एप्रिल 2024 पर्यंत गुरु तुमच्या लाभस्थानात राहणार आहेत त्यामुळे करिअर धनलाभ आणि नात्यांमध्येही चांगली स्थिती राहणार आहे एक मे 2024 रोजी गुरु तुमच्या बाराव्या स्थानी प्रवेश करणार आहे ज्यामुळे तुम्हाला काही अडचणींना तोंड द्यावे लागेल शनीचे भ्रमण तुमच्या भाग्यस्थानात होत असल्याने नवीन नोकरीच्या संधी तुम्हाला मिळू शकतील परंतु नोकरीत चांगले यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल 29 जून ते 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत शनी वक्री राहतील या काळात करियर आणि आर्थिक बाबतीत थोडा संघर्ष करावा लागेल
एप्रिल 2024 नंतर तुमच्या खर्चामध्ये वाढ होईल धनलाभ जरी झाला तरीही धनसंचय होणार नाही 11 जून 2024 पर्यंत शुक्राची स्थिती चांगली राहील यावेळी चांगले धनलाभ होतील यावर्षी राहू आणि केतू तुमच्या दशम आणि चतुर्थस्थानातून भ्रमण करतील त्याचे संमिश्र परिणाम तुम्हाला मिळतील
विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या हे वर्ष थोडे निराशा जनक असू शकते यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना बरीच मेहनत घ्यावी लागेल परंतु व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हे वर्ष अतिशय अनुकूल राहिल
एक मे 2024 पर्यंत गुरु तुमच्या लाभस्थानात राहणार आहे त्यामुळे कुटुंबात एखादे मंगल कार्य होऊ शकेल मात्र एक मे नंतर गुरु तुमच्या 12 व्या स्थानातून भ्रमण करेल ज्यामुळे कुटुंबात काही समस्या येऊ शकतात तुम्ही नवीन घरात प्रवेश करू कुटुंबात मतभेद किंवा वादविवाद होण्याची शक्यता आहे
केतूचे प्रमाण चौथ्या स्थानातून तर राहू दशम स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे प्रेमी लोकांना तसेच वैवाहिक जीवनातही अनेक समस्या उत्पन्न होऊ शकतात ज्यामुळे नात्यातील आनंद हरवू शकतो सामंजस्य हाच एक त्यावर उपाय आहे
एप्रिल 2024 पर्यंत आरोग्य चांगले राहील परंतु त्यानंतर थकवा आणि तणाव जाणवू शकेल आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आईच्या आरोग्यासाठी जास्त पैसेही खर्च करावे लागतील
