जैसे कर्म तैसे फल


न्यूजमंडी/पॉझिटिव्ह
दोन वर्षाच्या मुलीचा आयक्यू सोसायटीमध्ये समावेश
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

 

वॉशिंग्टन

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सातत्याने नवनवीन विक्रमांची नोंद केली जात असते आता नुकत्याच एका नव्या विक्रमाची नोंद झाली असून ज्यामध्ये फक्त दोन वर्षाच्या मुलीचा एका आयक्यु सोसायटीमध्ये समावेश करण्यात आल्याच्या विक्रमाची दखल घेण्यात आली आहे जगभरात सर्वात जास्त बुध्यांक म्हणजेच आयक्यु असलेल्या व्यक्तींची जी मेनसा नावाची सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये या दोन वर्षाच्या मुलीला प्रवेश देण्यात आला आहे ती सोसायटीतील सर्वात लहान सदस्य असून म्हणूनच तिच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे इस्ला मॅकनाब असे या मुलीचे नाव असून ती क्रेस्टवूड येथे राहत आहे तिच्या वयोगटांमध्ये तिने आयक्यु चाचणीत सर्वात जास्त म्हणजे 99% गुण मिळवल्याने तिचा समावेश या सोसायटीत करण्यात आला आहे इस्लाच्या पालकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दीड वर्षाची असल्यापासूनच तिला इंग्रजी भाषेची सर्व अक्षरे पाठ झाली होती तिच्या ज्ञानात सातत्याने भर पडत असल्याने जेव्हा या सोसायटीतील प्रवेशासाठी तिला परीक्षा देण्याची वेळ आली तेव्हा तिने तब्बल 99% मार्क मिळवले या सोसायटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी किमान 98 टक्के मार्क मिळवणे आवश्यक असते मेन्सा सोसायटीची इसला सदस्य झाल्यामुळे भविष्यात तिच्या बुद्धिमत्तेला अजून आकार येऊ शकेल अशी आशा तिच्या पालकांना वाटत आहे

 

न्यूजमंडी/ज्ञानकोश
अविश्वास ठराव
अविश्वास ठराव किंवा No Confidence Motion हे शब्द आपण अनेकदा ऐकतो पण हा अविश्वास ठराव म्हणजे नेमकं काय?तो कुणाविरोधात कुठे आणला जातो? आणि त्यामुळे इतिहासात किती सरकारं पडली आहेत? ‘अविश्वास ठराव’ या दोन शब्दांमध्येच अर्थ स्पष्ट होतो – एखाद्या सभागृहाच्या नेत्यावर त्या सभागृहाला भरवसा आहे की नाही, याची चाचपणी करायला आणला जातो तो अविश्वास ठराव किंवा No Confidence Motion.एखाद्या सरकारला आपलं कामकाज करायला किती लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आहे, याची ही परीक्षा असते.भारतीय राज्यघटनेच्या कलम 75(3) नुसार पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं उत्तरदायित्व हे लोकसभेप्रती असतं. लोकसभेचा कुठलाही सदस्य सरकारच्या कामकाजावर, एखाद्या धोरणावर नाखूश असेल किंवा कुण्या कारणाने सरकार अल्पमतात आलं असेल तर तो सरकारविरोधात अविश्वास ठराव आणू शकतो.

 

न्यूजमंडी/सुविचार
१. आपण किती समोर आलो आहोत फक्त यासाठीच मागे वळून पहा.

२. संकटांना घाबरून मागे फिरायचे की धैर्याने त्यांना सामोरे जायचे? निर्णय तुमचा आहे.

Advertisement

३. साधी सरळ दिसणारी माणसं मूर्ख नसतात ते फक्त हाच विचार करतात की समोर दिसणारी माणसं चांगल्या मनाची आहेत.

 

 

न्यूजमंडी/विनोद
फुटबॉल
नवरा तिच्या गरोदर बायकोला दवाखान्यात घेऊन जातो.
तेवढ्यात एक माणूस विचारतो – तुमची बायको आहे काय?
नवरा – हो…!
माणूस – प्रेग्नंट आहेत काय?
नवरा (चिडून) – नाही नाही…
कोण म्हणाले…! तिने तर फुटबॉल गिळलाय…!

प्रसन्न
देव – मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पाहिजे…?
गण्या – पैशांनी भरलेली Bag, नोकरी आणि
एक मोठ्ठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुली असतील.
देव – तथास्तु
(गण्या आता कंडक्टर आहे)

प्रवचन
पोलीस – काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री…?
बंड्या – प्रवचन ऐकायला…
पोलीस – कोणत्या विषयावर प्रवचन आहे…?
बंड्या – दारूपासून होणारे दुष्परिणाम
पोलीस – एवढ्या रात्री कोण देत प्रवचन…?
बंड्या – माझी बायको…

न्यूजमंडी/खाद्ययात्रा

 


खोबऱ्याचे लाडू
खोबरा किसचे लाडू लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. हे लाडू झटपट तयार होतात व स्वादिष्ट, चविष्ट लागतात. तर झटपट तयार होणाऱ्या मऊसुद लाडूची रेसिपी बघूया
साहित्य

काजू – १/४ कप दूध पावडर – १/४ कप . तूप – १ चमचा खोबरा कीस – ३ कप वेलची पूड – १/४ चमचा दूध – ११/४ कप
साखर – १ कप
कृती

सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात काजू व दूध पावडर घेऊन बारीक पूड तयार करून घ्या. व बाजूला ठेवून द्या.त्यानंतर एका पॅनमध्ये १ चमचा तूप घाला व ३ कप खोबऱ्याचा कीस घालून मंद आचेवर ८ ते १० मिनिटे परतत भाजून घ्या. नंतर खोबरा कीस चा हलकासा रंग बदलतो.त्यानंतर त्यात ११/२ कप दूध घाला. म्हणजे जेवढा खोबरा कीस घेतलेला आहे त्याच्या अर्ध्या क्वांटिटी मध्ये दूध घाला व एकत्र करा.आणि हे मिश्रण मंद आचेवर १० ते १२ मिनिटे परतत रहा.नंतर त्यात काजू व दुध पावडर ची तयार केलेली पूड घाला. त्याने लाडूला छान चव येते. व नंतर आणखी थोडावेळ मंद आचेवर परतत रहा.आता हे मिश्रण चांगले भाजून झाल्यावर त्यात १ कप साखर घाला व मंद आचेवर छान परतत राहा.थोडा वेळाने साखर वितळायला लागेल व हे मिश्रण ओलसर होईल. मिश्रण सतत परतत राहायचे थोड्यावेळाने त्याचा गोळा तयार होईल. गोळा तयार होईपर्यंत सतत परतत राहायचं व छान भाजून घ्यायचं.आता थोडा वेळ हे मिश्रण थोड थंड होऊ द्या. व हलकं गरम असतानाच त्याचे लाडू बांधून घ्यायचे.लाडू बांधताना एका बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये खोबरा कीस घ्या. व लाडू बांधून झाला की त्याला त्या खोबरा कीस मध्ये घुळवून घ्या म्हणजे तो दिसायला खूप छान दिसतो.अशाप्रकारे सर्व लाडू बांधून घ्यायचे. हे लाडू साधारण दोन दिवस बाहेर टिकतात व फ्रिजमध्ये ठेवल्यास पंधरा दिवस टिकतात

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!