राजू वाघमारे शिंदे गटात


काँग्रेसला पुन्हा मोठं खिंडार,बड्या नेत्याने पक्ष सोडला

Advertisement

मुंबई
काँग्रेसमधून एकामागे एक नेते बाहेर पडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी काँग्रेसची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी काँग्रेसवर घणाघाती हल्ला त्यांनी केला.त्यामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. मुंबईतील बडे राजकीय व्यक्तीमत्व मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी पक्ष सोडला.त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाला रामराम केला. मग बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसची साथ सोडली. आता काँग्रेसला आणखी झटका बसला आहे. आता पक्षाची भूमिका माध्यमांकडे मांडणाऱ्या व्यक्तीनेच हा धक्का दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!