वार्षिक राशिभविष्य २०२४
वृषभ

संपूर्ण वर्ष प्रगतिशील
न्यूज मंडी च्या वाचकांना नूतन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे नवीन वर्ष हे तुमच्यासाठी उत्तम आणि लाभदायक असले तरीही या महिन्यात होणाऱ्या शनि मंगळ युती योगाचा त्रास होऊ शकतो. काही ज्ञात आणि अज्ञात शत्रूंच्या कारवायांना तुम्हाला तोंड द्यावे लागेल. 1 मे रोजी तुमच्या राशीत होणारा गुरु प्रवेश हा सर्वार्थाने लाभदायक ठरेल. नोकरदारांना पगारवाढ तर व्यावसायिकांना नवीन संधी मिळतील. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भाग्योदय होईल. मात्र वर्षभर शत्रुत्व सांभाळावे लागेल, मग ते नातेवाईक असो किंवा कामाच्या ठिकाणी असलेले सहकारी असो किंवा शेजारी असो. परंतु संपूर्ण वर्ष मात्र प्रगतिशील राहील.
ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीचे लोक शांत व प्रेमळ असतात. या लोकांकडे नेहमी धनसंपत्ती भरभरून असते आणि समाजात त्यांना नेहमी आदर-सन्मान मिळत असतो या राशीचे लोक खूप जास्त निश्चयी असतात आणि कठीण प्रसंगात चांगले निर्णय घेतात त्यांना इतरांना मदत करायला आवडते त्यांना एकटे राहणे आवडते आणि त्यांना नवीन लोकांना भेटायला फारसे आवडत नाही, असे मानले जाते. असे म्हणतात की, हे लोक खूप कष्टाळू असल्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी नेहमी यश मिळते.ज्योतिषशास्त्रानुसार हे लोक शिस्तप्रिय असल्याने ते त्यांचे काम चोखपणे वेळेत पूर्ण करतात आणि ते इतरांना प्रोत्साहनही देतात. या राशीच्या लोकांना नवे मित्र बनविताना अडचणी येतात. त्यामुळे या लोकांना खूप कमी मित्र असतात.
यावर्षी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल एक मे 2024 पर्यंत गुरु तुमच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे तसेच शनि हा वर्षभर दशमस्थानातून भ्रमण करणार आहे त्यामुळे नोकरीमध्ये तसेच तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मानसन्मान आणि उच्च पद मिळण्याची शक्यता आहे
राहू केतूचा मीन आणि कन्या राशीत होणारा प्रवेश तुमच्या राशीसाठी अनुकूल आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तुम्हाला चांगले यश प्राप्त होईल एक मे नंतर गुरु तुमच्याच राशीत पदार्पण करेल त्यामुळे तुमचा ओढा अध्यात्मिक कार्याकडे जास्त राहील यावर्षी नोकरीमध्ये बदली किंवा बदल होऊ शकतो गुरुचे हे भ्रमण काही बाबतीत प्रतिकूल राहील परंतु यावर्षी वडिलोपार्जित संपत्ती तसेच अन्य प्रकारे धनलाभ होऊ शकतो
भाग्येश शनीचे दशम स्थानातून होणारे भ्रमण तुम्हाला काही नवीन संधी प्राप्त करून देऊ शकतात परंतु त्यामुळे कामाचा व्याप खूप वाढू शकतो यावर्षी प्रमोशन साठी किंवा पगार वाढीसाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल यावर्षी नोकरीत अचानक बदली होऊ शकते
विद्यार्थ्यांना यावर्षी चांगले शैक्षणिक यश मिळवण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल यावर्षी कुटुंबात संपत्ती वरून काही वादविवाद होऊ शकतात
अष्टमेश गुरु तुमच्या राशीमध्ये येणार असल्याने तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत काही समस्या होऊ शकतात डोळे आणि गळ्याशी संबंधित काही समस्या तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने तसेच काही ताण-तणावामुळे पचनाशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात
