जे होणार ते होणारच
न्यूजमंडी/पॉझिटिव्ह
तंत्रज्ञानाचा वापर करून मनुष्य अमर होणार
प्रख्यात भविष्यवादी तज्ञाचा दावा

वॉशिंग्टन
गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून जीवनशैलीमध्ये अनेक महत्त्वाचे बदल घडले आहेत आधुनिक जीवनशैलीमध्ये तंत्रज्ञान हे अविभाज्य अंग बनले आहे आता याच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मनुष्य अमर होऊ शकतो असा दावा प्रख्यात भविष्यवादी तज्ञाने केला आहे रे कुर्जवेल असे या तज्ञाचे नाव असून आगामी आठ वर्षांच्या कालावधीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून मनुष्य अमरत्व मिळवू शकतो असा दावा त्यांनी केला आहे कुर्जवेल हे प्रख्यात भविष्यवादी असून नेहमीच भविष्यात कोणत्या गोष्टी घडू शकतात याबाबत त्यांनी आत्तापर्यंत अंदाज व्यक्त केले आहेत त्यांनी व्यक्त केलेले अनेक अंदाज आत्तापर्यंत खरेही ठरले आहेत ते कोणत्याही प्रकारचे भविष्य वर्तवत नाही तर तंत्रज्ञान कोणत्या पातळीपर्यंत पोहोचू शकते आणि कोणत्या गोष्टी प्रत्यक्षात अमलात येऊ शकतात याचा अंदाज व्यक्त करतात 1993 मध्ये त्यांनी संगणकाच्या माध्यमातून बुद्धिबळ खेळून ग्रँड मास्टरला पराभूत करता येऊ शकेल असा दावा केला होता आणि 2000 मध्येच रशियन ग्रँडमास्टर गॅरी कास्परावला पराभूत करण्याचे काम डीप ब्ल्यू या संगणकाने केले होते मोबाईलचा वापर त्यातही स्मार्टफोनचा वापर ही आज सर्वसाधारण जीवनशैली बनली असली तरी काही वर्षांपूर्वी रे यांनी स्मार्टफोन हा जगण्याचा अविभाज्य भग बनेल असाही अंदाज व्यक्त केला होता आणि तो अंदाज आता प्रत्यक्षात येताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर आता रे यांनी आगामी आठ वर्षांच्या कालावधीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मनुष्य अमरत्वाला पोहोचू शकतो असा दावा केल्याने त्याबाबत उत्सुकतेने चर्चा केली जात आहे रे यांनी काही वर्षांपूर्वी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचाही उल्लेख केला होता आता येत्या आठ वर्षांच्या कालावधीमध्ये म्हणजे 2030 पर्यंत आर्टिफिशल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर करून मनुष्य अमर होऊ शकतो असा विचार रे यांनी व्यक्त केला आहे
न्यूजमंडी/ज्ञानकोश
गुलझारीलाल नंदा

1966 मध्ये गुलझारीलाल नंदा हे देशाचे गृहमंत्री होते. त्यावेळी गोहत्या प्रतिबंध कायद्यावरुन हिंदू समुदायाच्या भावना तीव्र होत्या. गोहत्या प्रतिबंध कायदा यावा यासाठी सतत आंदोलनं होत असत.1966 मध्ये या कायद्यासाठी साधू संतांनी दिल्लीतील संसदेवर मोर्चा काढला होता. या मोर्चावेळी साधू-संत आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालत सरकारी स्थळांची आणि मालमत्तेची नासधूस केली. त्यानंतर त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात 8-9 आंदोलकांचे प्राण गेल्याचं नंतर आलेल्या अहवालात म्हटलं होतं. एकूणच हे प्रकरण नीट न हाताळल्यामुळे इंदिरा गांधी गुलझारीलाल नंदा यांच्यावर नाराज झाल्या आणि त्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढलं. गुलझारीलाल नंदा यांना स्वतःला वाटायचं की गोहत्या बंदी व्हावी यामुळे त्यांनी आंदोलकांबाबत सहानुभूतीची भूमिका बाळगली आणि त्यामुळे त्यांच्या निर्णयक्षमतेवर परिणाम झाल्याचं म्हटलं गेलं. दिल्ली पोलिसांंनी आंदोलकांना डीटीसी (सिटी बस) मधून भरून अरावलीच्या जंगलात ( गुडगावजवळ) सोडून दिलं. त्यांच्याविरोधात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.या घटनेनंतर गुलझारीलाल नंदा यांना राजीनामा द्यावा लागला. असं म्हटलं जातं की इंदिरा गांधी यांनी नंदा यांना आधीच सांगितलं होतं की परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते तुम्ही अगोदरच तयार राहा. पण नंदा हे गृहमंत्री होते त्याचवेळी ते भारत साधू समाज नावाच्या एका संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांना असा विश्वास होता की वाटाघाटीतून ते हा प्रश्न सोडवू शकतील. पण तसं घडलं नाही.

न्यूजमंडी/सुविचार
१. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही तर बरीच नाती ही अहंकारानेसुद्धा तुटतात.
२. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच.
३. खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते.

न्यूजमंडी/विनोद
तलवार
तलवार पास होने से कुछ नहीं होता,
तलवार चलाना भी आना चाहीये…
असे status टाकणारे पोर डॉक्टरने
इंजेक्शन काढले की,
मोठमोठ्याने रडतात…!!!
रिकामटेकडे
माझे काही मित्र एवढे रिकामटेकडे आहेत
कि, बसल्या बसल्या
मुंग्यांचा रस्ता अडवून बोलतात…
आता कुठून जातेस बघतोच…!!!
मालक
काल एकाला उधारी मागण्यासाठी
घरच्या लँडलाईन वर फोन केला,
तर तो म्हणतो,
“अरे यार, थोडा वेळाने फोन कर…
मी आता गाडी चालवतोय…..”
फक्त मोबाईलाच माहीत असतं,
की, आपला मालक काय गुणांचा आहे…!!!

न्यूजमंडी/खाद्ययात्रा
मेथांबा
साहित्य
200 ग्राम कमी आंबट कैरी 100 ग्राम गुळ 1/4 टिस्पून मेथी पावडर तेल गरजेनुसार मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ चवीनुसार 1 टेबलस्पून साखर
कुकिंग सूचना
कृती
कैरी स्वच्छ धुवून, पुसून, साले काढून मोठे तुकडे करून घ्यावे.तेलाची फोडणी करून त्यात मोहरी, हिंग, मेथी पावडर, हळद घालावी.कैरीच्या फोडी तिखट मीठ घालावे.एकत्र करून झाकण ठेवून शिजवून घ्यावी.गुळ, साखर घालून गुळ विरघळून घ्यावा.छान मिक्स झाले की गॅस बंद करावा.आपला आंबट गोड चवीचा चटकदार मेथ्यांबा तयार आहे
