अदिती राव हैदरीने केलं लग्न


प्रसिद्ध अभिनेत्याशी मंदिरात साधेपणाने बांधली लग्नगाठ

Advertisement

मुंबई
सुप्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरीने दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थशी तेलंगणामध्ये लग्नगाठ बांधली आहे, हे तिचे दुसरे लग्न आहे अदिती व सिद्धार्थ यांनी तेलंगणातील वानापर्थी जिल्ह्यातील श्रीरंगापुरम येथील श्री रंगनायकस्वामी मंदिरात लग्न केलं अद्याप या दोघांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही याबाबत काहीच माहिती दिलेली नाही.
‘महा समुद्रम’ नावाच्या चित्रपटात अदिती व सिद्धार्थने एकत्र काम केलं होतं. त्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आदिती व सिद्धार्थ एकमेकांच्या प्रेमात पडले आणि रिलेशनशिपमध्ये होते. अनेकदा ते कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावत असतात. चंदीगडमध्ये बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नालाही त्यांनी सोबत हजेरी लावली होती. ते शरवानंदच्या लग्नाला एकत्र गेले होते. त्या दोघांनी नात्याची जाहीरपणे कबुली दिलेली नव्हती, पण ते अनेकदा शहरात एकत्र फिरताना दिसायचे.अदिती व सिद्धार्थ दोघेही घटस्फोटित आहेत. अदितीचं पहिलं लग्न अभिनेता सत्यदीप मिश्राशी झालं होतं, तर सिद्धार्थने मेघना नारायणशी लग्न केलं होतं. नंतर त्यांचा घटस्फोट झाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!