सातारा ,माढा येथे ७ मे ला मतदान
महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान
नवी दिल्ली
देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगाने सात टप्प्यातील मतदान कार्यक्रम आज जाहीर केला. त्यानुसार १९ एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. तर, महाराष्ट्रातही ५ टप्प्यात निवडणूक होणार आहे.सातारा आणि माढा मतदारसंघात ७ मी रोजी मतदान होणार आहे
केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार म्हणाले, देशात लोकसभा निवडणूक ५४३ जागांवर निवडणूक होणार आहे. सात टप्प्यात ही निवडणूक होणार असून पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे.
राज्यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होईल. तसेच दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला, तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी, चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे, पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे, सहाव्या टप्प्यातील मतदान २५ मे रोजी आणि सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे.
पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर,
दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणीला मतदान होईल.
तिसऱ्या टप्प्यात 7 मे रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगलेला मतदान होईल.
चौथा टप्पा 13 मे: नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ.
देशात सात टप्प्यात निवडणूक होणार
फेज १ – १९ एप्रिल
फेज २ – २६ एप्रिल
फेज ३ – ७ मे
फेज ४ – १३ मे
फेज ५ – २० मे
फेज ६ – २५ मे
फेज ७ – १ जून
कोणत्या राज्यात किती टप्प्यांत होणार मतदान?
अरुणाचल प्रदेश, अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेश, चंदीगढ, दादरा नगर हवेली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंड आदी राज्यांत एका टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर या राज्यांमध्ये दोन टप्प्यांत मतदान होईल. तर, छत्तीसगड, आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान होईल. ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये चार टप्प्यात मतदान होणार असून महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीरमध्ये पाच टप्प्यात मतदान होईल. तसंच, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत मतदान होणार आहे.
