मनोज जरांगे दिवसेंदिवस विकृत होत चाललेत


उपमुख्यमंत्र्यांची जात काढल्याने आनंद दवे संतापले
पुणे :ब्राम्हण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मनोज जरांगे दिवसेंदिवस विकृत होत चालले आहेत. धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी आग्रही असणाऱ्या जरांगे यांनी आज उपमुख्यमंत्र्यांची जात काढली आहे, या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत, असं आनंद दवे म्हणाले.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेतली होती. आजच्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस हे बामणी कावा करत असल्याचा आरोप केला होता. जरांगे यांनी केलेल्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी अधिक भाष्य करणं टाळलं आहे. जरांगे काय बोलले हे ऐकलं नाही, त्यामुळं काय बोलणार असं फडणवीस म्हणाले. फडणवीस यांच्यावर जरांगे यांनी केलेल्या टीकेनंतर ब्राम्हण महासंघ मात्र आक्रमक झाला आहे. ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मराठा आरक्षण सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनीच दिलं होतं. आज जरांगे ज्या सरकारकडे जात आहेत त्या सरकारचे उपमुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत. हातातून प्रश्न पूर्ण सुटलेला असताना आणि आता मी लोकांना फसवू शकत नाही हे कळाल्यानंतर जरांगेंचा मानसिक तोल ढळला आहे, अशी टीका दवे यांनी केली.
मराठा आरक्षण महाराष्ट्रात सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. ती टिकलं नाही, टिकेल की नाही हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. लोकांना आता आपण फसवू शकत नाही हे लक्षात आल्यानं मनोज जरांगे यांचा तोल गेलेला आहे. जरांगे आता विकृततेकडे गेलेले आहेत. महाराष्ट्राला जातीयता आणि विष परवडणार नाही. मनोज जरांगे यांनी देखील ते ऐकावं, अशी आमची भूमिका असल्याचं आनंद दवे म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!