सोमवारी साताऱ्यात अर्थसंकल्पावर चर्चा
आम्ही पुस्तकप्रेमी व दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे आयोजन
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि आम्ही पुस्तक प्रेमी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता दीपलक्ष्मी सभागृह येथे अर्थसंकल्प 2026 वर चर्चा आयोजित करण्यात आली आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करणार आहेत.या अर्थसंकल्पाचा अर्थ सांगणाऱ्या या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ बँकिंग तज्ञ श्रीराम नानल आणि ज्येष्ठ पत्रकार व कर सल्लागार मुकुंद फडके सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थतज्ञ प्राध्यापक डॉक्टर विजय कुंभार असणार आहेत. सातारकर नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस ,विनोद कुलकर्णी, श्रीकांत कात्रे यांनी केले आहे

