सातारा नगर वाचनालयात बुधवारपासून शारदीय व्याख्यानमाला
रविवारपर्यंत विविध मान्यवरांचे विचार ऐकायला मिळणार
सातारा
येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा यांच्या वतीने कै ल ना तथा दादा वाडीकर स्मृतीप्रित्यर्थ शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन बुधवार दिनांक 21 ऑक्टोबर ते रविवार दिनांक 25 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे . सायंकाळी ठीक सहा वाजता नगर वाचनालय पाठक हॉल येथे ही व्याख्याने होणार आहेत .बुधवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी कवी हनुमंत चांदगुडे यांचे लोककलातील कविता लोकसंस्कृतीचा अविष्कार या विषयावर व्याख्यान होणार आहे. गुरुवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी दीपक सुधाकर कुलकर्णी यांचे हटके सोचो या विषयावर व्याख्यान आहे. शुक्रवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सचिन प्रभुणे यांची मुलाखत तुषार भद्रे घेणार असून त्या मुलाखतीचा विषय आकाशवाणीचे दिवस हा आहे. शनिवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी राजेंद्र अलोणे कराड यांचे आहुतींनीसिद्ध केला मंत्र वंदे मातरम हे व्याख्यान होणार आहे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी श्रेयस तेजस रानडे आणि सहकारी पुणे यांचा स्वरयात्रा हा मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. रसिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगर वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, उपाध्यक्ष अतुल जोशी आणि विश्वस्त समितीचे अध्यक्ष अनंतराव जोशी यांनी केले आहे

