प्रपंच हा ईश्वराच्याआध्यात्मिक रचनेचा एक भाग
ज्ञानयज्ञ कार्यक्रमात डॉक्टर सुभाष आगाशे यांचे प्रतिपादन
सातारा
मानवी आयुष्यातील प्रपंच हा ईश्वराच्या आध्यात्मिक रचनेचा एक भाग आहे त्यामुळे प्रपंच सोडून परमार्थ करू नका असा संदेशच भारतीय अध्यात्मिक शास्त्र देते असे प्रतिपादन डॉ सुभाष आगाशे यांनी केले
बाळासाहेब शिवदे यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रवचन मालेमध्ये बोलत होते
सुभाष आगाशे म्हणाले,संपूर्ण विश्वाच्या रचनेचा प्रपंच हा एक भाग आहे लोककल्याण हा हेतू समोर ठेऊन प्रापंचिक जबाबदारी पूर्ण करणे म्हणजे एक प्रकारे परमार्थच आहे हे संपूर्ण जग चालवणारा ईश्वर आहे आणि हा ईश्वर प्रत्येकाच्या अंतरंगातच असतो त्याला समजून घेणे आणि ओळखणे महत्वाचे आहे
देवाची किंवा ईश्वराची अनादी आणि अनंत अशी रूपे आहेत ईश्वर चराचरात व्यापून आहे तो आनंदस्वरूप आणि ज्ञानस्वरूप आहे विविध मार्गानी या ईश्वरापर्यंत पोहोचता येते ध्यानधारणा ,नामस्मरण किंवा प्रार्थना या साधनांचा वापर करून ईश्वरप्राप्ती शक्य असते असे यावेळी डॉ सुभाष आगाशे यांनी सांगितले
डॉ सुभाष आगाशे यांनी यावेळी ध्यानधारणा कशी करावी आणि कधी करावी याबाबत मार्गदर्शन केले प्रत्येकाच्या अंतरंगात असलेल्या ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी या साधनांचा युगचे वापर करायला हवा असे त्यांनी स्पष्ट केले
रवींद्र शिवदे यांच्या पिरवाडी येथे श्रद्धा बंगल्यामध्ये ही प्रवचन माला सुरू असून शुक्रवार दिनांक 14 जून पर्यंत ती चालू राहणार आहे संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या प्रवचन मालेसाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे
