साताऱ्यात रविवारी शब्दचांदणे’ कोजागिरी काव्य संमेलन
संस्कार भारती आणि दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे आयोजन
सातारा :
संस्कार भारती साहित्य विधा, सातारा आणि दीपलक्ष्मी पतसंस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शब्दचांदणे’ कोजागिरी काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.हे काव्य संमेलन रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ८ वाजेपर्यंत दीपलक्ष्मी पतसंस्था सभागृह, सातारा येथे होणार आहे.
कोजागिरी पौर्णिमेच्या शब्दरूप चंद्रप्रकाशासोबत काव्याचा आनंद घेण्याची संधी या संमेलनातून रसिकांना मिळणार आहे. या काव्य संमेलनासाठी पूर्व नावनोंदणी आवश्यक असून प्रवेश विनामूल्य आहे. सहभागी कवींनी शक्यतो चंद्र आणि चांदणे या विषयांवर स्वरचित कविता सादर कराव्यात,काव्यप्रेमी आणि साहित्य रसिकांनी या आगळ्यावेगळ्या काव्य मैफलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी डॉ. सुनील देशपांडे (वाई) – ९४२३८६५४५८, . मुकुंद फडके (सातारा) – ९५५२५९३२९७, संजीव आरेकर (सातारा) – ८१४९९१२६८७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्कार भारती जिल्हाध्यक्ष श्री दिलीप चरेगावकर,संस्कार भारती साहित्य विधा जिल्हाप्रमुख डॉ सुनील देशपांडे यांनी केले आहे.

