हास्यजत्रेच्या कलाकारांचा नवा चित्रपट


लेखक सचिन मोठे,दिग्दर्शक सचिन गोस्वामी

मुंबई :
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे.आता हास्यजत्रेची टीम एक नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं नाव ‘गुलकंद’ असं आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या सिनेमाची घोषणा झाली आहे.यामध्ये प्रसाद ओक, सई ताम्हणकर, समीर चौघुले आणि ईशा डे आणि वनिता खरात हे कलाकार असणार आहेत.सचिन मोटे यांनी ‘गुलकंद’ या चित्रपटाचं लिखाण केलं आहे, तर सचिन गोस्वामी दिग्दर्शन करत आहेत.

Advertisement

 


अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या सिनेमाचं शूटिंग सुरु झालं असून त्याची झलकही समोर आली आहे. या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. ‘गुलकंद’ हा एक फॅमिली कॉमेडी चित्रपट असणार आहे. या सिनेमाचं शूटिंग सुरु झालं असलं तरी सिनेमा कधी प्रदर्शित होणार, याची तारीख मात्र अद्याप मात्र समोर आलेली नाही.
हास्यजत्रेच्या प्रत्येक कलाकारावर प्रेक्षकांचं प्रेम आहे. या सगळ्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. आता हे कलाकार एकत्र मिळून लवकरच रुपेरी पडद्यावर येत असल्यानं प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. या चित्रपटाविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
या चित्रपटात प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. सई ताम्हणकर येणाऱ्या काळात मराठी सोबतच अनेक हिंदी चित्रपटातही दिसणार आहे. तर प्रसाद ओक येत्या काळात धर्मवीर २ मध्ये दिसणार आहे. तर समीर चौघुले आणि ईशा डे हास्यजत्रेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!