यशोदाचा एमसीए विभाग घडवितोय उद्याचे माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ


उद्योगाभिमुख शिक्षण, अत्याधुनिक सुविधा आणि दमदार प्लेसमेंटच्या बळावर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरची भक्कम वाटचाल

सातारा :

माहिती तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, क्लाऊड संगणन, सायबर सुरक्षा, सॉफ्टवेअर विकास आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित तज्ज्ञांची मागणी सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथील संगणक अनुप्रयोगातील पदव्युत्तर पदवी (एमसीए) विभाग विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण, आधुनिक तांत्रिक कौशल्ये आणि उत्कृष्ट प्लेसमेंटच्या माध्यमातून सक्षम माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक म्हणून घडवत आहे.

यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील एमसीए विभागाने गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच उद्योगाभिमुख प्रशिक्षण, इंटर्नशिप, कौशल्यवर्धक प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. वैष्णवी पार्टे, रोहन देशमुख आणि प्रियांका पवार यांची टीसीएस या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली असून, ऐश्वर्या सपकाळ, सुनील पेठकर, धनश्री शिंगाडे आणि श्रुती जाधव यांची एकमेइन्फोव्हिजन कंपनीमध्ये निवड झाली आहे. दिव्या काटे हिला विप्रो, तर निरंजन भोसले याला इन्फोसिस या आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीत संधी मिळाली आहे.

तसेच सायली बोराटे (क्यू वोनेक्स सोल्युशन्स), प्रियांका वाघमोडे (एआरएल सॉफ्टटेक), विक्रांत माने (अनूंत टेक्नॉलॉजी), किरण वाघ (रेनबो इंटरनॅशनल), फैजान बघावं (मीम कॉम्प्युटर्स), सूर्यवंशी संग्रामसिंग (विरून टेक्नॉलॉजी), प्रथमेश माने (सिम्स आयटी सर्व्हिसेस), प्रणव मोहिते (आय एम अल्फा), निशांत कांबळे (प्राईम टेलीसर्व्हिसेस), वैशाली शिंदे (गायत्री इन्फोटेक), विनायक रावळ (यश गणा फ्लेक्स प्रिंटिंग) आणि सानिका घाडगे (ऑल फन फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) या प्रतिष्ठित संस्थांमध्ये यशस्वीरीत्या निवड झाली असून, त्यांनी आपल्या करिअरची यशस्वी सुरुवात केली आहे.

Advertisement

एमसीए विभागामध्ये अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा, उच्चगती इंटरनेट सुविधा, अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन, उद्योगतज्ज्ञांची व्याख्याने, औद्योगिक भेटी, संशोधन व नवोपक्रमाला प्रोत्साहन, तसेच प्लेसमेंटपूर्व प्रशिक्षण यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यात येतो. पायथन, कृत्रिम बुद्धिमत्ता, अॅडव्हान्स्ड जावा, सायबर सुरक्षा, फुल स्टॅक डेव्हलपमेंट यांसारख्या कौशल्यवर्धक अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थी उद्योगाच्या अपेक्षांनुसार अधिक सक्षम बनतात.

आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विस्तार केवळ सॉफ्टवेअर कंपन्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. बँकिंग, आरोग्य, ई-कॉमर्स, उत्पादन उद्योग, शिक्षण, शासकीय संस्था तसेच नवउद्योगांमध्येही एमसीए पदवीधारकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे यशोदा टेक्निकल कॅम्पस विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानाबरोबरच नेतृत्वगुण, समस्या सोडविण्याची क्षमता आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यावर सातत्याने भर देत आहे.

प्रा. डॉ. अजिंक्य सगरे यांचे मनोगत

“आज माहिती तंत्रज्ञान हे प्रत्येक उद्योगाचे आधारस्तंभ बनले आहे. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना केवळ पदवी मिळवून देत नाही, तर त्यांना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम, कौशल्यसंपन्न आणि उद्योगसज्ज व्यावसायिक म्हणून घडवितो. आधुनिक अभ्यासक्रम, अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि प्रभावी प्रशिक्षण व प्लेसमेंट प्रणाली यांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या उज्ज्वल करिअरची भक्कम पायाभरणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी करिअर घडविण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी यशोदा टेक्निकल कॅम्पस हे निश्चितच विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक केंद्र आहे.” – प्रा. डॉ. अजिंक्य सगरे, उपाध्यक्ष, यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!