मंगळवारी साताऱ्यात सुरेल गाण्यांची मैफल
दीपलक्ष्मी पतसंस्था,संगीतप्रेमीतर्फे आयोजन
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व संगीतप्रेमी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक १६ जून रोजी सायंकाळी सहा वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये गाण्यांची सुरेख सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद लोंढे, राजेंद्र पाटील व विनयकुमार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सारिका देशपांडे,,मुकुंद फडके, डॉ श्याम बडवे,धनाजी शिंदे,शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत. या संगीत कार्यक्रमात लीना निश्चल(कोल्हापूर).रागिणी शिकलगार, प्रिती लिमये,अस्मिता होके,किशोर होके,राहुल शेंडे,सलीम चाचा, प्रदीप पवार,संजय खराटे ,सतीश जाधव,संदेश जावळे,कादिर सय्यद,शरीफ सलाती,तबरेज बागवान आणि इतर गायक कलाकार गाणी सादर करणार आहेत.सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

