अमेरिकेच्या अंतरंगात पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन
सातारा
ज्येष्ठ लेखक व निवृत्त बँक अधिकारी श्रीराम नानल यांनी लिहीलेल्या व चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या अमेरिकेच्या अंतरंगात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार दिनांक 24 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे होणार आहे. चपराक प्रकाशन, दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि आम्ही पुस्तकप्रेमी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे अध्यक्ष दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे असणार असून 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा होणार आहे . यावेळी सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाह शिरीष चिटणीस, ज्येष्ठ लेखक आम्ही पुस्तक ,प्रेमी समूहाचे संस्थापक डॉक्टर संदीप श्रोत्री जेष्ठ पत्रकार व लेखक मुकुंद फडके आणि चपराक प्रकाशनचे संचालक घनश्याम पाटील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कारंजकर करणार आहेत
सर्वांनी या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन लेखक व आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे समन्वयक श्रीराम नानल आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री विनायक भोसले यांनी केले आहे

