विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बालकुमार साहित्य संमेलनाची गरज .विजय गायकवाड


लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर येथे एकविसावे मराठी बालकुमार साहित्य संमेलन उत्साहात .

Advertisement

सातारा
विद्यार्थ्यांच्या मध्ये जन्मजात अनेक गुण असतात या कलागुणांना वाव देण्यासाठी बालकुमार साहित्य संमेलनाची आज गरज आहे असे प्रतिपादन 21 व्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विजय गायकवाड यांनी केले .
सातारा औद्योगिक वसाहती मधील लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर येथे 21 वे मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून विद्यालयाचा माजी विद्यार्थी विजय गायकवाड याची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.दिलीप गरुड कार्यवाह अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे तसेच लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस व अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा सातारचे अध्यक्षा शिल्पा चिटणीस, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या बाबर,ज्योती नलवडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती .
गायकवाड पुढे म्हणाले लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था ही सर्व बाजूंनी सक्षम आहे . खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लोकमंगल विद्यालयाचा वेगळा ठसा उमटवला आहे. प्रत्येक गोष्टीला अर्थ असतो यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या अनुभवाचा फायदा करून घेतला पाहिजे. आपल्यामध्ये असणारे उपजत गुण हे विद्यार्थ्यांनी अशा साहित्य संमेलनातून दाखवले पाहिजेत .
शिरीष चिटणीस म्हणाले लोकमंगल प्राथमिक विद्या मंदिरातील शिक्षक हे विद्यार्थ्यांची नेहमीच काळजी घेतात. बालकुमार साहित्य संमेलना मुळे विद्यार्थ्यांच्या मधील उपजत गुणांना वाव मिळतो . विद्यार्थ्यांच्या कडे असणारे गुण ओळखण्या साठीच बालकुमार साहित्य संमेलनाची नितांत गरज असते. शिक्षणातून माणूस मोठा होतो . आई वडील जसे आपल्याला घरी संस्कार देतात त्याच पद्धतीचे चांगले संस्कार देण्याचे कार्य ही शाळा करीत असते .विद्यार्थ्यांनी नेहमी चांगलं वाचलं पाहिजे . वाचनाची आवड निर्माण झाल्यास चांगला विद्यार्थी घडेल .
डॉ .दिलीप गरुड म्हणाले विद्यार्थ्यांचे कलागुण वाढवण्यासाठी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते . विद्यार्थ्यांनी आपले गुण दाखवल्यास ते उत्तुंग भरारी घेऊ शकतात . शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले गुण ओळखून त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे .अभ्यासा बरोबर वाचन, लेखन याचीही आवड जोपासली पाहिजे .
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बनवलेली हस्तलिखिते ज्यामध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गाचे बाळ गोपाळ, इयत्ता दुसरीच्या वर्गाचे आठवण, इयत्ता तिसरीच्या वर्गाचे ऋणानुबंध व चौथीच्या वर्गाचे सोनचाफा या हस्तलिखितांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले .
या बालकुमार साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांनी कविता, गोष्टी, गप्पा गाणे तसेच नृत्य, पोवाडे ,कथाकथन असे विविध कार्यक्रमाचे सादरीकरण केले .
कार्यक्रमाचे नेटके नियोजन संदीप जाधव, ज्ञानेश्वर मोहटकर, कल्याण भोसले, बाळकृष्ण इंगळे,चंद्रकांत देवगड यांनी केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कल्याण भोसले यांनी केले .उपस्थिताचे आभार ज्ञानेश्वर मोहटकर यांनी मानले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!