धावडशी येथे परशुराम जयंती उत्सव


शनिवारपासून विविध धार्मिक कार्यक्रम

Advertisement

सातारा
धावडशी येथील श्री देव भार्गवराम देवस्थान कमिटी ट्रस्टी आणि सर्व धावडशीकर ग्रामस्थ यांच्या वतीने परशुराम जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. 18 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीमध्ये दररोज पूजा, अभिषेक, नैवेद्य ,आरती पालखी, कीर्तन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. नव
शनिवार दिनांक 18 एप्रिल आणि रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प संदीपबुवा मांडके यांचे कीर्तन होणार आहे.19 एप्रिल रोजी परशुराम जन्मोत्सव असल्याने त्या दिवशी जन्म काळाचे किर्तन होणार आहे सोमवार दिनांक 20 एप्रिल रोजी हभप श्री भास्कर बुवा काणे यांचे लळीताचे कीर्तन होणार आहे. सर्व भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव भार्गवराम देवस्थान कमिटी ट्रस्टीने केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!