एस पी बालसुब्रमण्यम यांच्या गाण्यांना रसिकांचा प्रतिसाद


दीपलक्ष्मी पतसंस्था व सुरीली शामतर्फे आयोजन

सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि सुरीली श्याम यांच्या संयुक्त विद्यमाने दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे ज्येष्ठ गायक एस पी बालसुब्रमण्यम यांच्या गाण्यांचा कार्यक्रम झाला. गायक चित्रकार कैलास मोहिते यांनी एकट्याने सुब्रमण्यम यांची विविध गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजकुमार निकम,मुकुंद फडके,शिरिष चिटणीस उपस्थित होते.
सलमान जखम,कमल हसन अशा अनेक दिग्गज कलाकारांचा आवाज म्हणून ओळख असलेल्या एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात वेगळीच जादू आहें. गायक कैलास मोहिते यांनी २० पेक्षा जास्त गाणी उत्कृष्टपणे सादर करून रसिकांची वाहवा मिळवली
यावेळी बोलताना मुकुंद फडके यांनी एस पी बालसुब्रमण्यम यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. एस पी बालसुब्रमण्यम फक्त एक गायक नव्हते तर एक उत्कृष्ठ डबिंग आर्टिस्ट होते असे त्यांनी सांगितले. शिरीष चिटणीस यांनी एस पी बालसुब्रमण्यम हे विक्रम करणारे गायक होते असे सांगितले. राजकुमार निकम यांनी जीवनातील संगीताचे महत्व स्पष्ट केले
स्वतः कलाकार असलेल्या कैलास मोहिते यांनी या कार्यक्रमासाठी उत्कृष्ठ धवनियंत्रणा आणि प्रकाशयोजना उपलब्ध केली होती

Advertisement

फोटो

दीपप्रज्वलन करताना राजकुमार निकम,शेजारी प्रीती लिमये,शिरीष चिटणीस,मुकुंद फडके व इतर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!