लोकमंगल हायस्कूलमध्ये गायन स्पर्धा
गुरु हे भेटावे लागतात :शिरीष चिटणीस
सातारा
लोकमंगल हायस्कूल नागेवाडी -कुशी मध्ये गायन स्पर्धा मोठ्या उत्सहात साजरी झाली. याप्रसंगी विविध गीते विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गायली. या स्पर्धेची सुरुवात भालेराव यांच्या, काट्याकुट्याच्या तुडवीत रस्ता या कवितेने झाली. या प्रसंगी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले, गुरु हे भेटावे लागतात. गुरुमुळे मानवी जीवन आकार घेत असते . तसेच गायन हे मानवी जीवनाचा एक अविष्कार आहे.पुणे हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र आहे.आपल्यातील कलागुणांचा विकास करण्यासाठी पुण्यामध्ये सर्व प्रकारचे शिक्षण उपलब्ध आहे. तसेच आजच्या जीवनात पुस्तकांना सुद्धा अतिशय महत्त्व आहे. चांगली पुस्तके आपल् आयुष्य बदलू शकतात.हीच पुस्तके मानवी जीवनात प्रेरणादायी ठरतात. ग्रंथांचे महत्त्व जाणून आपण वाढदिवसाला पुस्तके भेट दिली पाहिजेत.खेडेगावातील भजनी मंडळ गायनाचे धडे देणाऱ्या संस्था आहेत असेही त्यांनी विशद केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या माननीय डॉ. शमा देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मानवी जीवनात आपल्या तब्येतीचे महत्त्व समजून दिले . निरोगी शरीरामुळे आपले आयुष्य वाढते.संगीताने मनातील भावना व्यक्त होते. लहान थोरांना गीत गाणे आवडते. गायन मानवी जीवनातील ताण तणाव दूर करतात.. गायनाची ही परंपरा या विद्यालयाने जपली आहे. याचे कौतुक वाटते. संगीत मुळे मानवी व व्यक्तिमत्व वाढते. शिक्षणात पुढे अनेक वाटा आहेत. परंतु आपले करिअर निवडताना आपण आपली आवड जपली पाहिजे. ते महत्त्वाचे आहे,असे त्या म्हणाल्या
याप्रसंगी डॉ.नचिकेत देशपांडे डॉ. अपूर्वा देशपांडे सौ शिल्पा चिटणीस उपस्थित होत्या.

