ऑक्सफर्ड विद्यापीठात शृष्टी शिंदेची निवड
सातारा
कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ऍन्ड रिसर्च वर्ये सातारा या इन्स्टिट्यूटमधील शृष्टी शिंदेची निवड ऑक्सफर्ड विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी झाली आहे तिने इन्स्टिट्यूट मधुन नुकतीच बीबीए पदवी संपादन केलेली आहे व पदव्युत्तर शिक्षण एम एस इन इंटरनॅशनल बिझनेस यासाठी ऑक्सफर्ड ब्रोकली युनिव्हरसिटी युके येथे प्रवेश घेतला आहे.
या इन्स्टिट्यूटमधून पदवीचे शिक्षण घेऊन पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशात जाणारया विद्यार्थ्यास प्राचार्य शंकरराव उनउने सरांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू व या इन्स्टिट्यूटचे माजी विद्यार्थी श्री अमोल उनउने यांनी रूपये पन्नास हजार ची शिष्यवृत्ती जाहीर केलेली आहे.त्या रकमेचा धनादेश देऊन कुमारी सृष्टी अंकूश शिंदे हिचा गौरव व सत्कार प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी श्री अमोल उनउने यांच्या हस्ते करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात संचालक डॉ बी एस सावंत यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्या काळामध्ये संस्थेच्या आठ विद्यार्थ्यांना इंग्लंडला शिक्षणासाठी पाठविले होते. आण्णांच्या नावाने असलेल्या या इन्स्टिट्यूटमधून प्रत्येक वर्षी परदेशात शिक्षणासाठी विद्यार्थी जावेत यासाठी मार्गदर्शन कक्षाद्वारे विशेष प्रयत्न केले जातात याचा सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
शिष्यवृती दिल्याबद्दल त्यांनी अमोल उनउने यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय डॉ. एस. एस. भोला यांनी करून दिला. त्यानंतर विविध मान्यवरांनी शृष्टी शिंदे हिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या विशेष सोहळ्याच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी प्रा.प्रिंयका शिंदे मॅडम यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली. विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला
डॉ. एस. आर. निकम यांनी आभार प्रदर्शन केले.

