साताऱ्यात रविवारी हिंदी गीतांचा कार्यक्रम
मोहम्मद रफी यांच्या अजोड गीतांचा कार्यक्रम
सातारा
आशा हेमंत जाधव प्रस्तुत स्वर रजनी पुकारता चला हु मे हा मोहम्मद रफी यांच्या अजोड गीतांचा कार्यक्रम रविवार दिनांक १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५- ३० वाजता शाहू कला मंदिर येथे आयोजित केलेला आहे.हा कार्यक्रम लाइव्ह होणार आहे. या कार्यक्रमामध्ये हेमंत जाधव, चंद्रकांत शिंदे आणि अनुराधा पंडितराव हे कलाकार स्वरसाज चढवणार आहेत. तर वाद्य वृंदांमध्ये शांताराम दयाळ ( तबला ), केदार गुळवणी ( व्हायोलिन ), विजय कांबळे ( ऑक्टो पॅड ), की बोर्ड ( केदार परांजपे ), स्वरा किरपेकर ( संवादिनी ), प्रशांत दयाळ ( साईड रिदम/ ढोलक ) हे कलाकार साथ संगत करणार आहेत कार्यक्रमाचे संगीत संयोजन हे राजेंद्र आफळे यांचे आहे. सदर कार्यक्रमाची निर्मिती ही स्वरतुषार या संस्थेची आहे. कार्यक्रमाचे निवेदन ऍड रेशमा वाळिंबे करणार असून ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे यांची आहे. या कार्यक्रमाकरिता देसाई ग्रुप, बी. ए. काटदरे मसालेवाले, दोशी ट्रेडर्स, वैभव घोरपडे, नाना देशमुख, संजय क्षीरसागर, चारुशीला पंडितराव, राजेश कोरपे यांचे सहकार्य लाभले आहे.सदर कार्यक्रम हा सर्व सातारकर रसिकांना विनामूल्य असून सर्व रसिक श्रोत्यांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केलेले आहे

